Next
‘विद्यार्थ्यांनी सार्वत्रिक दृष्टीने विचार करायला पाहिजे’
प्रेस रिलीज
Monday, October 08, 2018 | 01:01 PM
15 0 0
Share this story

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. मृदुला कर्णिक.

औंध : ‘जेव्हा आपण नाविन्यपूर्ण विचार करतो किंवा नाविन्यपूर्ण शोध लावतो. तेव्हा त्याला नाविन्यपूर्ण रिसर्च म्हणतात. उदाहरणार्थ एका कावळ्याने आपली तहान भागवण्यासाठी खोल माठात खरे टाकून पाण्याला वरती आणले आणि आपली तहान भागवली. हा एकप्रकारचा नाविन्यपूर्ण शोधत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक राजहंस दडलेला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी साचेबंद विचार न करता सार्वत्रिक दृष्टीने विचार करायला पाहिजे,’ असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. मृदुला कर्णिक यांनी केले.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सहा ऑक्टोबरला रिसर्च आविष्कार मार्गदर्शनपर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. कुशल पाखले, डॉ. सविता पाटील, प्रा. शशी कराळे, डॉ. तानाजी हातेकर, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. आसावरी शेवाळे, प्रा. सायली गोसावी, प्रा. किरण कुंभार, प्रा. प्रदीप भिसे, प्रा. हर्षकुमार घळके, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.

डॉ. कर्णिक म्हणाल्या, ‘आपण नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी विचार करायला लागल्यास आपला रिसर्च नाविन्यपूर्ण ठरतो. नाविन्यपूर्ण शोधामुळे अनेकांचे कल्याण होणार असेल, तर तो रिसर्च चांगला ठरतो. आजपर्यंत मानवाने अनेक शोध लावले आहेत. प्रत्येक शोध एकापेक्षा वेगळा नाविन्यपूर्ण असल्याचे दिसून येते.’

या वेळी डॉ. कर्णिक यांनी टाकाऊ वस्तूपासून नाविन्यपूर्ण टिकाऊ वस्तू बनविण्याचे, तसेच नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट कसा लिहावा याविषयीचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘आजच्या तरुणांना संशोधनामध्ये उंच भरारी घेण्यासाठी मोठी संधी आहे. नुकतेच मानव संसाधन विकासाचे प्रमुख प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे की, केंद्राच्या पातळीवर एक वेबसाइट तयार करण्यात आली असून, त्याच्या माध्यमातून जवळपास पन्नास हजार नाविन्यपूर्ण गोष्टींचा शोध लागला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या नावावर पेटंट मिळवण्यासाठी ही एक नवी संधी उपलब्ध आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आजूबाजूच्या परिसरातील समस्या शोधून त्यावर नाविन्यपूर्ण पद्धतीने संशोधन केल्यास त्यांच्या  नावावर पेटंट जमा होतील.’

‘रयत शिक्षण संस्था शंभराव्या वर्षांत पदार्पण करत असून, सध्या केंद्र शासनाने चार नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट चालवण्याची परवानगी संस्थेला दिली आहे. यामार्फत विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात उंच भरारी घेण्याची मोठी संधी मिळणार आहे. विदयार्थ्यांनी छोट्या मोठ्या आविष्कार रिसर्चमध्ये सहभागी होतानाच केंद्र शासनाच्या आविष्कार रिसर्चमध्ये पेटंट मिळवण्यापर्यंत मजल मारावी,’ असे डॉ. बोबडे यांनी नमूद केले.

पाहुण्यांची ओळख प्रास्ताविक व प्रा. डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले. प्रा. डॉ. संजय नगरकर यांनी आभार मानले. या प्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link