Next
सुदृढ आरोग्याचे मंत्र
BOI
Wednesday, May 02 | 03:31 PM
15 0 0
Share this story

तहान लागल्यावर विहीर खणणे किती मूर्खपणाचे, हे आपण सर्व जण जाणतोच आणि तरीही नेमके तेच आपण आपल्याच आरोग्याच्या संदर्भात करत असतो. कंबरदुखी/गुडघेदुखी/बद्धकोष्ठता सुरू झाली, मूळव्याध उद्भवली, लठ्ठपणा जाणवला किंवा अशा इतर तक्रारी जाणवल्या, की मग आपण पळतो डॉक्टर्सकडे; आपण वेळोवेळी काळजी घेतली, व्यायाम आणि आहार सांभाळला, तर बहुतांशी आजारांपासून दूर राहू शकतो, हे माहीत असूनही आपण आचरणात मात्र आणत नाही. डॉ. रवी आहेर यांचं ‘हेल्थ सिक्रेट्स - रहस्य आरोग्याचे’ हे पुस्तक याचसंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करते...
..........
बाजारात आरोग्यविषयक अनेक पुस्तकं असताना डॉ. रवी आहेर यांना ‘हेल्थ सिक्रेट्स - रहस्य आरोग्याचे’ हे पुस्तक लिहावंसं वाटलं, यातून त्यांची समाजाविषयीची कळकळ दिसून येते. माणूस सोपे आणि घरगुती व्यायाम आणि उपाय करून बऱ्याच व्याधींपासून मुक्त होऊ शकतो हे त्यांना जाणवलं आणि मग स्वस्थ बसवलं नाही. म्हणून त्यांनी अत्यंत सोप्या, सामान्यजनांना कळेल अशाच भाषेत हे पुस्तक लिहिलं आहे. हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य.

डॉ. आहेर यांनी या पुस्तकाचे सहा विभाग केले आहेत. पहिल्या ‘प्रतिबंध’ या विभागातील प्रकरणांत विविध आजारांची आणि दुखण्यांची कारणं आणि लक्षणं सांगून त्या आजारांपासून दूर राहण्यासाठीचे प्रतिबंध (उपाय) काय असावेत, याचं उत्तम विवेचन केलं आहे. 

दुसऱ्या भागात आहाराचे आरोग्यमंत्र सांगितले आहेत. चुकीचा आहार म्हणजे काय आणि तो टाळून समतोल आहार काय असावा याची उत्तम माहिती दिली आहे. 

तिसऱ्या विभागात गर्भधारणा आणि मातेने बाळंतपणात घ्यायची काळजी, बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काय करावं, याची सोप्या शब्दांत माहिती दिली आहे. 

चौथ्या भागात चांगल्या आरोग्यासाठी दिनचर्या कशी असावी, काय खावं, कधी आणि किती खावं याची माहिती आहे.

पाचव्या भागात काय आणि किती व्यायाम करावा, प्रत्येक प्रकारच्या व्यायामाचे फायदे काय हे विशद केलं आहे. 

सहाव्या भागात विविध प्रकारच्या अवयवांसाठी कोणकोणते विशिष्ट व्यायाम करावेत, हे चित्रांच्या साह्याने सांगितलं आहे. हे संपूर्ण प्रकरणच मुळी चित्ररूप आहे, त्यामुळे समजायला सोपं. 

शेवटच्या ‘आरोग्यमंत्र’ या परिशिष्टामधून आरोग्यासाठीच्या सहजसुंदर, सोप्या टिप्स दिल्या आहेत. हे पुस्तक जरूर वाचावं असं आहे. 

पुस्तक : हेल्थ सिक्रेट्स - रहस्य आरोग्याचे   
लेखक : डॉ. रवी आहेर    
प्रकाशक : डॉ. रवींद्र कारभारी आहेर   
संपर्क : ९८९०४ १०१०२   
पृष्ठे : २०६  
मूल्य : ३०० ₹ 

(‘रहस्य आरोग्याचे’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link