Next
‘आयएमआय’चा ३५वा दीक्षांत समारंभ उत्साहात
प्रेस रिलीज
Saturday, April 27, 2019 | 10:46 AM
15 0 0
Share this article:


मुंबई : नवी दिल्लीतील इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (आयएमआय) या भारतातील आघाडीच्या मॅनेजमेंट स्कूलचा ३५वा वार्षिक दीक्षांत समारंभ नुकताच उत्साहात झाला. ‘मेक माय ट्रिप’चे संस्थापक आणि ग्रुप सीईओ दीप कालरा दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. या समारंभात ३४९ विद्यार्थ्यांना पदविका (डिप्लोमा) प्रदान करण्यात आली.

पीजीडीएम प्रोग्रामच्या २२५ विद्यार्थ्यांना, पीजीडीएम-एचआरएम प्रोग्रामच्या ३६ विद्यार्थ्यांना, पीजीडीएम (बीअँडएफएस) प्रोग्रामच्या ५३ विद्यार्थ्यांना, पीजीडीएम (एक्स-पीजीडीएम) प्रोग्रामच्या ३२ विद्यार्थ्यांना आणि एफपीएम प्रोग्रामच्या तीन विद्यार्थ्यांना डिप्लोमा प्रदान करण्यात आला.

‘आयएमआय’चे डायरेक्टर जनरल डॉ. हिमाद्री दास म्हणाले, ‘या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. तुमचा सीव्ही तुम्ही तुमच्या सिद्धींच्या बळावर समृद्ध करा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एक चांगला मनुष्य व्हा. त्यासाठी तुम्हाला कोणताही नैतिक अभ्यासक्रम करण्याची गरज नाही. विनयशील राहिलात, तर मान सन्मान मिळवाल. या संस्थेत आम्हा सर्वांचा हा ठाम विश्वास आहे, की आपल्या देशाला एका नाविन्यपूर्ण आणि आकर्षक भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी आमचे विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावतील. मनात ही दृढ श्रद्धा ठेवून मी तुम्हाला शुभेच्छा देतो.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search