Next
‘रिक्षा फॅशन शो’चे आयोजन
BOI
Friday, January 25, 2019 | 06:53 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील ‘रिक्षा परिषदे’च्या वतीने शनिवारी (२६ जानेवारी) ‘राज्यस्तरीय रिक्षा फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी रिक्षा व्यवसायातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असून बक्षिसांचेही वितरण करण्यात येणार आहे. 

शहरातील घोरपडी पेठ उद्यानासमोरील महानगरपालिका शाळेत शनिवारी (२६ जानेवारी) सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत हा शो होईल. त्यानंतर रात्री नऊ ते १२ या वेळेत भवानी पेठेतील सावित्रीबाई सांस्कृतिक हॉलमध्ये सत्कार समारंभ व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

२०१०मध्ये ‘रिक्षा परिषदे’तर्फे ‘रिक्षा फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले होते. त्या धर्तीवर आता पुन्हा एकदा या ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन ‘रिक्षा परिषदे’च्या वतीने करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search