Next
जीवनदीप महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
दत्तात्रय पाटील
Saturday, March 16, 2019 | 05:38 PM
15 0 0
Share this storyठाणे : भारतीय समाजाचा एक अविभाज्य भाग असलेल्या आदिवासी समाजाचे स्वरूप समजून घेता यावे व जागतिकीकरणाचा या समाजावर काय प्रभाव पडला या सर्व घटकांची चर्चा घडून यावी या उद्देशाने ठाणे जिल्ह्यातील खर्डी येथील जीवनदीप कॉलेजात नुकतेच राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले होते. ‘जागतिकीकरणाचा भारतीय आदिवासी समुदायावर पडलेला प्रभाव’ हा या चर्चासत्राचा विषय होता.

सलग दोन दिवस या विषयातील बारकावे जाणून घेण्यात आले. मुंबईतील भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषदेचे (आयसीएसएसआर) पश्चिम विभागीय केंद्र आणि खर्डीतील जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज यांच्या वतीने हे चर्चासत्र घेण्यात आले.  

या वेळी मुंबई विद्यापीठाचे कला शाखा अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एम. एस. कुऱ्हाडे हे प्रमुख उद्घाटक, तर बीजभाषक म्हणून मुंबई विद्यापीठातील समाजशास्त्र अभ्यास मंडलाचे अध्यक्ष तथा विद्यापीठाच्या राजीव गांधी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. बालाजी केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, प्राचार्य के. आर. कळकटे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्राचे उदघाटन झाले.

हे चर्चासत्र चार सत्रात विभागले गेले होते. यात आदिवासी समाजाच्या शिक्षणव्यवस्थेवर, अर्थव्यवस्थेवर, साहित्यावर, भाषांवर, लोकसाहित्य व परंपरांवर जागतिकीकरणाचा काय परिणाम झाला याविषयी विचार मंथन झाले. चर्चासत्रासाठी १५० संशोधक, विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यासक उपस्थित होते. या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या शोधनिबंधाचे ग्रंथरूपाने प्रकाशनदेखील करण्यात आले. चर्चासत्राचे समन्वयक प्रा. दत्तात्रय भुताळे आणि इतर प्राध्यापकांनी या चर्चासत्राचे यशस्वी नियोजन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link