Next
अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
प्रेस रिलीज
Wednesday, September 19 | 11:21 AM
15 0 0
Share this story



मुंबई : नवी मुंबईमधील अल्पसंख्याक समाजातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

या वेळी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफार मलिक, नसीम सिद्दीकी उपस्थित होते. प्रवेश झाल्यानंतर सुलतान मालदार यांना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव पद देण्यात आले.

नवी मुंबईमधील सुलतान अकबर मालदार यांच्यासह कुरेश सिद्दीकी, बिलाल सरगुरो, राशीद खान, अबु वैस मिर्जा, मुदस्सीर शेख, साकीब सैय्यद, जैद अमीन शेख, मौलाना इरशाद, जुबेर शेख, नाजीम शमसी, शेहजाद आलम कासमी आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी या वेळी प्रवेश केला.

‘राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. प्रत्येक समाजाला इथे न्याय दिला जातो. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहोत,’ अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link