Next
‘लिटिल व्हॉइस ऑफ रत्नागिरी’च्या निवड फेऱ्या आठ डिसेंबरपासून
BOI
Wednesday, December 05 | 04:23 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : बाल सूरवीरांचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या ‘लिटिल व्हॉइस ऑफ रत्नागिरी’ स्पर्धेच्या निवड फेऱ्यांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून, आठ डिसेंबर २०१८ रोजी दापोली केंद्रातून सुरुवात होणार आहे. हे या स्पर्धेचे पाचवे वर्ष आहे.

याबाबत स्पर्धेचे आयोजक आणि ‘मँगो इव्हेंट्स अँड सेलिब्रेशन्स’चे अभिजित गोडबोले यांनी माहिती दिली. या वर्षीही दापोली, चिपळूण, लांजा, रत्नागिरीसह देवरूखमध्ये निवड फेरी होणार आहेत. दापोलीमधील निवड फेरी आठ डिसेंबरला सकाळी १० वाजता सीबीएससी स्कूलमध्ये, तर नऊ डिसेंबरला देवरुख येथील ललित कला अकादमीमध्ये १० वाजता निवड फेरीला सुरुवात होईल. रत्नागिरी, चिपळूण व लांजा येथील तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. पाचही केंद्रांमधून अंतिम फेरीसाठी १० ‘लिटिल व्हॉइस’ची निवड करण्यात येईल. निवड फेरीमध्ये स्पर्धकाने किमान एका हिंदी व एका मराठी गीताची तयारी ठेवायची आहे; तसेच परीक्षकांच्या मतानुसार विविध गीतप्रकारांतील गाणी तयार ठेवणे आवश्यक आहे.

स्पर्धेच्या वैशिष्ट्यांमुळे ही स्पर्धा कोकणातील सर्वात दर्जेदार स्पर्धा ठरली आहे. गोडबोले यांचे समर्पक नियोजन, रंगमंचावरील आकर्षक सजावट, उत्तम लाइट इफेक्ट्स, स्पर्धकांचे खास चित्रीकरण, तसेच रत्नागिरीतील सर्वोत्तम वादक कलावंत व एस. कुमार साउंडचे उदयराज सावंत यांची दर्जेदार ध्वनिव्यवस्था यांमुळे ही स्पर्धा खास ठरते; तसेच महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रातील दिग्गज सेलिब्रिटी कलावंतांची परीक्षक म्हणून स्पर्धेला उपस्थिती हे या स्पर्धेचे आकर्षण आहे.

‘दर वर्षीप्रमाणे ‘लिटिल व्हॉइस ऑफ रत्नागिरी’ची अंतिम फेरी सात जानेवारी २०१९ रोजी रंगणार आहे. यंदा पाचवे पर्व असल्याने ही स्पर्धा खास असणार आहे. शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे भव्य रंगमंचावर ही स्पर्धा रंगणार असून, या वर्षीचे सेलिब्रिटी परीक्षकही महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रातील दिग्गज कलावंत असणार आहेत,’ अशी माहिती गोडबोले यांनी दिली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link