Next
स्वीट कॉर्न सूप
BOI
Wednesday, January 10 | 03:45 PM
15 0 0
Share this story

स्वीट कॉर्न सूप

घरात दुपारच्या वेळेस किंवा अगदी सकाळच्या नाश्त्यासाठीही दररोज काय वेगळे करावे, हा एक मोठा प्रश्नच असतो. मुलांच्या तर काही वेगळ्याच फर्माईशी असतात. थंडीच्या दिवसांत तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा येतो. शिवाय जास्त भूकही लागते. तेव्हा मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी चालतील असे नवनवीन चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ घेऊन येत आहोत, ‘खवय्येगिरी’ या सदरातून. आज पाहू या स्वीट कॉर्न सूप.. 
.........................................................
स्वीट कॉर्नस्वीट कॉर्न आणि त्यापासून बनवलेले पदार्थ तसे सगळ्यांनाच आवडतात. अगदी लहान मुलांनाही याचं आकर्षण असतं. थंडीच्या दिवसांत गरम पदार्थ खाण्यावर आपण भर देतो. यांत सूप हा एक प्रकार विशेष आवडीचा आहे. आजकाल विविध प्रकारच्या सूपचे तयार पॅकेट्स बाजारात मिळतात. स्वीट कॉर्न सूप हे एक आवडीच्या सूप प्रकारापैकी एक. ते घरच्या घरी बनवता येते. हे सूप भूकवर्धक असते. म्हणजेच ‘स्वीट कॉर्न’ने भूक वाढते. त्यामुळे जेवणाच्या आधी ते घेतल्यास भूक वाढण्यास मदत होते. 

साहित्य : 
स्वीट कॉर्न – एक छोटा डबा, कॉर्नफ्लावर – दोन मोठे चमचे, लोणी – दोन मोठे चमचे, अजीनोमोटो पावडर – अर्धा छोटा चमचा, पत्ता कोबी – अर्धा कप, गाजर – एक, कांदा – एक, चीज क्यूब – दोन


कृती :
- सर्वप्रथम कोबी, गाजर व कांदा बारीक चिरून घ्या.
- अर्धा कप पाण्यात कॉर्नफ्लावर टाका.
- एका भांड्यात सहा कप पाणी घेऊन ते गॅसवर ठेवा.
- थोड्या वेळाने त्या पाण्यात स्वीट कॉर्न व कॉर्नफ्लावर घाला.
- पाण्याला उकळी आल्यावर त्यात लोणी आणि अजीनोमोटो पावडर घाला.
- १० मिनिटे ते स्वीट कॉर्न छान शिजवा.
- आता त्यात कांदा, गाजर व कोबी घाला.
- पुन्हा पाच मिनीटे शिजवा.
- गॅस बंद करून किसलेले चीज टाका. गरम-गरम वाढा.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link