Next
‘जेट एअरवेज’तर्फे देशांतर्गत नव्या विमानसेवा
प्रेस रिलीज
Monday, September 03, 2018 | 03:32 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : भारताची प्रमुख आंतरराष्ट्रीय एअरलाइन जेट एअरवेजने देशांतर्गत व्यवसाय वृद्धींगत करण्यावर लक्ष केंद्रीत केले असून, ही कंपनी सप्टेंबर महिन्यात २८ नव्या विमानसेवा सुरू करीत आहे.

विमानसेवेचे भक्कम जाळे असलेल्या जेट एअरवेजने या उद्योगातील नव्या मार्गांबरोबरच नॉन-स्टॉप तसेच वन-स्टॉप अशा नव्या सेवा सुरू करणार असल्याने एअरलाइनचा ठसा अधिक भक्कम होणार आहे. याशिवाय, नव्याने उदयाला येत असलेल्या शहरांतून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी होणारी वाढती मागणी पूर्ण करणे देखील यामुळे शक्य होणार आहे. या नव्या सेवांमुळे महानगरांसह इतर शहरांतील प्रवाशांना देशांतर्गत प्रवासाबरोबरच मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या हबद्वारे एअरलाइनच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कनेही प्रवास करता येईल.

विमानसेवा उद्योगातील नऊ नव्या मार्गांवर जेट एअरवेज सेवा सुरू करीत आहे. मध्य प्रदेशातील सर्वात मोठे शहर असलेल्या इंदूरहून जोधपूर, तसेच वडोदरा ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. इतर प्रमुख पहिल्या सेवा म्हणजे, चंदीगढ आणि लखनऊ, अहमदाबाद आणि जोधपूर, तसेच वडोदरा आणि जयपूर अशा सेवा जेट एअरवेज कार्यान्वित करणार आहे. या मार्गांवर सेवा देणारी जेट एअरवेज ही देशातील एकमेव एअरलाइन असून, यामुळे उत्तर आणि मध्य भारत तसेच पश्चिम भारत हे जोडले जातील.

विद्यमान प्रमुख मार्गांवरील फेऱ्यांमध्येही एअरलाइन वाढ करणार आहे. मुंबई-गुवाहाटी आणि दिल्ली-बागडोगरा दरम्यानच्या नॉन-स्टॉप सेवांचा विस्तार तसेच मुंबई-बागडोगरा आणि नवी दिल्ली–गुवाहाटी मार्गांवर अतिरिक्त वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विमानसेवेचे जाळे अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने बंगळुरूहून लखनऊ, इंदूरहून कोलकाता, कोलकाताहून चंदिगढ, कोईम्बतूरहून हैदराबाद, विशाखापट्टणमहून मुंबई आणि दिल्ली अशा नॉन-स्टॉप विमानसेवा जेट एअरवेज सुरू करीत आहे. अशा सेवा सुरू करण्याची वाढती मागणी असून, प्रवाशांच्या या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी या नव्या सेवा सुरू करण्यात येणार आहेत.

इंदूरवर एअरलाइनने लक्ष केंद्रीत केले असून मध्यवर्ती ठिकाण आणि पायाभूत सुविधांचा विस्तार होत असल्याने हे शहर कंपनीच्या संपूर्ण भारतातील नेटवर्कचे केंद्रबिंदू बनत आहे. देशभरातील १४ शहरांना जोडणाऱ्या सेवा उपलब्ध करून जेट एअरवेज इंदूरबरोबरचे नाते बळकट करण्यासाठी सज्ज झाले आहे. इंदूरहून अहमदाबाद, जयपूर, वडोदरा, जोधपूर, अलाहबाद, चंदिगढ, लखनऊ, नागपूर आणि पुणे अशा उदयोन्मुख बाजारपेठा आणि छोट्या महानगरांदरम्यान नॉन-स्टॉप सेवा देणारी ही एकमेव एअरलाइन असेल.

इंदूरहून कोलकाता आणि हैदराबादसारखे महानगरांदरम्यान नॉन-स्टॉप सेवा देण्याबरोबरच, मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू येथील आपल्या हबशी इंदूर जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना सुलभरीत्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमध्ये सेवा उपलब्ध करता येईल. एअरलाईनची अलीकडच्या कोलकाता विमानसेवेमुळे कंपनी पूर्वेकडील प्रमुख व्यावसायिक आणि वित्तीय हबशी अखेर जोडली जाणार आहे.

इंदूर–वडोदरा आणि इंदूर-जोधपूर या नव्या सेवांमुळे या प्रत्येक शहरांतील पर्यटनाला तसेच व्यवसाय आणि आर्थिक घडामोडींना चालना मिळेल. विशेषत:, वडोदराबरोबरच जोधपूरमधील तसेच आसपासच्या लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळेल. या नव्या तसेच विद्यमान विमानसेवांमुळे जेट एअरवेजच्या प्रवाशांना इंदूरहून मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, जयपूर आणि नागपूर अशा एका दिवसात परतण्याच्या सेवा उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे बंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि कोलकाता येथील प्रवाशांना आता इंदूरमार्गे जोधपूर, अलाहबाद, वडोदरा आणि परतीचा प्रवास उपलब्ध होईल.

जेट एअरवेजचे वरिष्ठ उपाध्यक्ष, वर्ल्डवाइड सेल्स अॅंड डिस्ट्रिब्युशन, राज शिवकुमार म्हणाले, ‘इंदूर, जोधपूर, गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि वडोदरा अशा भारतभरातील उदयोन्मुख शहरांमध्ये हवाई प्रवासाला प्राधान्य दिले जात असल्याने या शहरांना इतर विमानसेवा सुरू करण्याची तेवढीत गरज होती. येत्या काही महिन्यांत वाढणारी मागणी लक्षात घेऊनच आम्ही वेळापत्रकाचे काटेकोरपणे नियोजन केले आहे. आमच्या चोखंदळ प्रवाशांना अतिरिक्त पर्याय, सोयीचे तसेच कनेक्टिव्हिटी आणि उत्तम सुविधा देण्याच्या उद्देशाने नव्या विमानसेवा, अतिरिक्त फेऱ्या, अधिकाधिक क्षेत्रांमध्ये पूर्ण क्षमतेने सेवा देण्यावर आमचा भर आहे.’

‘लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी हे फायदेशीर असून, कॉर्पोरेट प्रवाशांना देखील एका दिवसात परतीचा प्रवास शक्य होणार आहे. या नव्या विमानसेवांमुळे जेट एअरवेज हे सर्वाधिक पसंतीचे एअरलाइन असल्यावर शिक्कामोर्तब होईल आणि या प्रत्येक शहरांतील कनेक्टिव्हिटी, व्यापार आणि विकासाला यामुळे चालना मिळेल, याची मला खात्री आहे,’ असा विश्वास शिवकुमार यांनी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search