Next
डॉ. संतोष ढगे यांचे ह्रदयरोगावर व्याख्यान
प्रेस रिलीज
Tuesday, March 27, 2018 | 03:14 PM
15 0 0
Share this story

डॉ. संतोष ढगे
 पुणे :  कोथरूडमधील  सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाने नुकतेच आयुर्वेदिक हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संतोष ढगे यांच्या ‘मार्ग निरोगी हृदयाचा’ या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

‘हृदयावर मुळातच हजारो रक्तवाहिन्या बीजस्वरुपात आणि केशवाहिनी स्वरुपात अस्तित्वात असतात. सामान्यत:  त्या कार्यरत नसतात. शरीरात विशिष्ट अवस्था निर्माण झाल्यास त्या कार्यान्वित होऊन हृदयाचा रक्तपुरवठा वाढतो. त्यालाच नॅचरल बायपास असे म्हणतात. अशा प्रकारचे संशोधन अमेरिकन हार्ट असोसिएशन, एक्सपेरिमेंटल डिपार्टमेंट ऑफ कार्डिऑलॉजी जर्मनी, ब्रिटिश हार्ट फाऊंडेशन अशा संस्थांनी केले आहे’, असे  डॉ. संतोष ढगे यांनी सांगितले.

‘हृदयरोग, हृदयातील ब्लॉकेजेस् आणि हार्टअॅटॅक ही संपूर्ण जगाची गंभीर समस्या बनली असून भारतामध्ये तर वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी हार्टअॅटॅकने दगावले गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने, भारताची ओळख पुढील काही वर्षांत ‘हृदयरोग्यांचा देश‘ अशी होण्याचा इशारा दिला आहे. म्हणून संपूर्ण भारतात ‘हृदयरोग मुक्ती अभियान‘ चालविणे गरजेचे आहे, असे मत डॉ. ढगे यांनी व्यक्त केले.

‘नवीन संशोधनानुसार तुळशीमध्ये शरीरासाठी नको असलेले कोलेस्टेरॉलसारखे घटक जास्त प्रमाणात झाल्यास ते नष्ट करण्याची क्षमता आहे’, अशी माहितीही त्यांनी  या वेळी दिली. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link