Next
‘महिंद्रा समूह’ होणार कार्बन न्यूट्रल
BOI
Saturday, September 15, 2018 | 04:52 PM
15 0 0
Share this storyकॅलिफोर्निया : ‘महिंद्रा अँड महिंद्रा (एमअँडएम) या भारतातील आघाडीच्या युटिलिटी वाहन उत्पादक कंपनीने, २०४० या वर्षापर्यंत कार्बन न्यूट्रल होणार असल्याचे जाहीर केले. ‘महिंद्रा’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठी ऊर्जाबचत करण्यावर व अपारंपरिक उर्जेचा वापर करण्यावर भर देणार आहे. उर्वरित उत्सर्जनावर कार्बन सिंकद्वारे उपाय केला जाणार आहे. आपला संपूर्ण उद्योग समूह कार्बन न्यूट्रल होईल,’ असे आश्वासन महिंद्रा समूहाचे अध्यक्ष व सध्या सॅन फ्रान्सिस्को येथे सुरू असलेल्या ग्लोबल क्लायमेट अॅक्शन समिटचे सह-अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी दिले.

ते म्हणाले, ‘आम्ही या नव्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाच्या माध्यमातून हवामानातील बदलांविरोधातील जागतिक लढ्यामध्ये योगदान देत आहोत. २०४०पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्यासाठी ‘महिंद्रा’ तंत्रज्ञानातील प्रगतीचा व नुकत्याच जाहीर केलेल्या कार्बन प्राइसचा लाभ घेणार आहे.’

दी क्लायमेट ग्रुपच्या ‘ईपी१००’ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन ऊर्जा उत्पादकता दुप्पट करण्यासाठी बांधिलकी दर्शवलेली ‘एमअँडएम’ ही जगातील पहिली कंपनी होती. ऊर्जाबचत करणारे लायटिंग, कार्यक्षम हीटिंग, व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग (एचव्हीएसी), मोटर्स व हीट रिकव्हरी प्रोजेक्ट्स याद्वारे ‘एमअँडएम’ने वेळापत्रकाच्या १२ वर्षे आघाडीवर राहून ऑटोमोटिव्ह व्यवसायाची ऊर्जा उत्पादकता दुप्पट केली आहे. फार्म इक्विपमेंट बिझनेसही उद्दिष्ट साध्य करण्याच्या बाबतीत नियोजित वेळेपेक्षा आघाडीवर आहे आणि निम्म्याहून अधिक वेळापत्रक पूर्ण झाले आहे.

कार्बन न्यूट्रॅलिटीसाठी प्रयत्न करत असताना गरजेची गुंतवणूक उभी करण्याच्या दृष्टीने, उत्सर्जित केलेल्या प्रत्येक टन कार्बनसाठी १० डॉलर इंटर्नल कार्बन प्राइस जाहीर करणारी ही पहिली भारतीय कंपनी होती. आंतरराष्ट्रीय बेंचमार्कच्या आधारे व ऊर्जाबचत व अपारंपरिक ऊर्जा याबाबत उद्योगाने ठरवलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी जे गरजेचे आहे त्याच्या मूल्यमापनाने किंमत काळजीपूर्वक ठरवण्यात आली. कंपनीला कार्बन सिंकमध्ये १० वर्षांहून अधिक अनुभव आहे. या अनुभवाचा वापर करून, जागतिक दर्जाच्या पद्धतीने व सर्वोत्तम प्रोटोकॉल्सचे पालन करून उर्वरित उत्सर्जन हाताळण्यासाठी कंपनी उत्सुक आहे.

‘एमअँडएम’ आंतरराष्ट्रीय विना-नफा संस्था असलेल्या एन्व्हॉयर्नमेंटल डिफेन्स फंडाबरोबर (ईडीएफ) कार्बन न्यूट्रॅलिटीसाठी काम करणार आहे. ही संस्था कॉर्पोरेट सस्टेनेबिलिटी नेतृत्वासाठीचा दर्जा उंचावण्यासाठी आघाडीच्या कंपन्यांबरोबर काम करते. कंपनी कार्बन न्यूट्रॅलिटी साधण्यासाठी कृती करत असताना, ईडीएफ व अन्य भागीदारांबरोबर काम करणे कायम ठेवणार आहे.

‘एमअँडएम’ने विज्ञान-आधारित उपक्रमांमध्येही सहभाग नोंदवला असून, हे कार्यक्रम ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण पूर्व-औद्योगिक पातळीच्या वर दोन अंश सेल्सिअस खाली मर्यादित ठेवण्याच्या पॅरिस कराराच्या उद्दिष्टानुसार, कंपन्यांना उत्सर्जन कमी करण्यासाठी मार्ग सुचवतात. या सर्व प्रयत्नांमुळे कंपनीला कार्बन न्यूट्रल होण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मदत होत आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link