Next
‘महिंद्रा’तर्फे नवी आलिशान ‘एक्सयूव्ही५००’ दाखल
प्रेस रिलीज
Friday, April 20 | 02:40 PM
15 0 0
Share this storyमुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम लि.) या १९ अब्ज डॉलर उलाढालीच्या समूहाचा भाग असलेल्या कंपनीने आकर्षक डिझाइन, आलीशान, ऐसपैस इंटेरिअर व अधिक शक्ती व टॉर्क या वैशिष्ट्यांमुळे प्रीमिअम एसयूव्ही श्रेणीमध्ये ठसा उमटवणारी नवी आलिशान ‘एक्सयूव्ही५००’ दाखल केल्याचे जाहीर केले.

वाढीव सस्पेन्शनमुळे हे वाहन चालवण्याचा अधिक आनंद मिळतो, तसेच त्यामध्ये आवाजरहित केबिनही आहे. १२.३२ लाख रुपयांपासून (डब्ल्यू५ प्रकारासाठी एक्स-शोरूम मुंबई) किंमत असलेली ही गाडी महिंद्राच्या भारतभरातील डीलरशिपमध्ये तातडीने उपलब्ध होणार आहे.

या विषयी ‘महिंद्रा’च्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा यांनी सांगितले, ‘२०११ मध्ये दाखल करण्यात आल्यापासून, ‘एक्सयूव्ही५००’ने आकर्षक शैली, अत्याधुनिक वैशिष्ट्ये, अप्रतिम कामगिरी व सर्वोत्तम सुरक्षा यामुळे प्रीमिअम ‘एसयूव्ही’ श्रेणीमध्ये नवा ट्रेंड निर्माण केला आहे. ‘एक्सयूव्ही५००’ ने भारतात १२ ते १८ लाख रुपये या किंमतीच्या दरम्यान प्रीमिअम एसयूव्ही श्रेणीची निर्मिती केली आहे. तेव्हापासून नवे पायंडे पाडणे व चाकोरी मोडणे या बाबतीत आघाडी कायम ठेवली आहे. आज, नवी आलिशान ‘एक्सयूव्ही५००’ दाखल करून आम्ही लक्झरी व स्टाइल या बाबतीत नवे बेंचमार्क निर्माण करून या वाहनाचे महत्त्व अधिक वाढवले आहे. अधिक प्रीमिअम व आलिशान गाडीबद्दल ग्राहकांची वाढती आकांक्षा पूर्ण करण्याच्या हेतूने या गाडीचे डिझाइन केले आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link