Next
गोविंद नामदेव यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
BOI
Saturday, February 09, 2019 | 05:55 PM
15 0 0
Share this story


मुंबई : ‘सत्या’, ‘तक्षक’, ‘पुकार’, ‘सरफरोश’, ‘सरकार राज’, ‘राजू चाचा’, ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’, यांसारख्या हिट चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसलेले अभिनेते गोविंद नामदेव यांनी लिहिलेल्या ‘मधुकर शाह बुंदेला’ या पुस्तकाचे प्रकाशन महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते नुकतेच मुंबईत करण्यात आले. 

१८४२च्या दरम्यान झांशीजवळील तत्कालीन ओरछा नामक राज्याचे राजा मधुकर शाह यांच्या आयुष्यावर आधारित हे पुस्तक आहे. या पुस्तकातून राजा मधुकर शाह यांची वीरता आणि धैर्य दिसून येते. 

महानायक अमिताभ बच्चन यांनी पुस्तकाचे विमोचन केले. ‘पहिल्यांदाच एका हिंदी पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते होत आहे, याचा मला खूप आनंद आहे. गोविंद नामदेव हे केवळ एक चांगले अभिनेता नसून ते उत्तम लेखकही आहेत. त्यांच्यात निस्सिम देशभक्ती आहे. या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने मला या कार्यक्रमाचा भाग होता आले, त्याबाबत मी स्वतःला खूप भाग्यवान समजत आहे’, अशा विनम्र शब्दांत बिग बी यांनी गोविंद नामदेव यांचे तोंडभरून कौतुक केले. 

आपल्या पुस्तकाबाबत बोलताना गोविंद नामदेव यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ‘मी मूळ बुंदेलखंडचा असल्याने तिथल्या इतिहासाबद्दल मला नेहमीच आकर्षण राहिले आहे. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधून बाहेर पडल्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रात रमलो. त्या काळात लिखाण झाले नाही. मात्र वेळ मिळेल तेव्हा मी बुंदेलखंडला जात असे. या पुस्तकाचे विमोचन अमिताभ बच्चन यांच्या हस्ते झाल्याने मी खूप आनंदीत आहे’, अशा शब्दांत त्यांनी आपला आनंद व्यक्त केला. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link