Next
महिला कलाकारांनी साकारला हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ
प्रेस रिलीज
Monday, July 16, 2018 | 02:04 PM
15 0 0
Share this storyपुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशनतर्फे हिंदी चित्रपटांच्या सुवर्ण काळातील ड्युएट म्हणजे युगूलगीतांच्या ‘कजरा मोहब्बतवाला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला गायक-वादक कलाकारांनी जुन्या हिंदी चित्रपटातील स्त्री युगल गीतांची मैफल रंगवली.

सूर सखी संस्थेद्वारे हा कार्यक्रम ‘गाणी दोघींची-आवड सगळ्यांची’ अशी मध्यवर्ती संकल्पना घेऊन सादर करण्यात आला. यात रसिकांनी जुन्या अजरामर गीतांचा आस्वाद घेतला. विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह (सेनापती बापट रस्ता) येथे १३ जुलै रोजी हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमाची निर्मिती मानिनी गुर्जर यांची होती. संकल्पना, निवेदन रंजना काळे यांचे होते. मानिनी गुर्जर, अनुराधा पटवर्धन, देवयानी सहस्रबुद्धे यांनी गीते सादर केली. संपदा देशपांडे, उमा जटार, किमया काणे, उर्मिला भालेराव, भावना टिकले, शिल्पा आपटे यांनी साथसंगत केली. या कार्यक्रमात अनेक संगीतकारांच्या रचना सादर करण्यात आल्या. जुन्या हिंदी चित्रपटांच्या सुवर्णकाळातील गायिकांनी गायलेली अजरामर स्त्री द्वंद्व गीते या कार्यक्रमात सादर केली.

कार्यक्रमादरम्यान १८ गीते सादर करण्यात आली. यामध्ये ‘चूप चूप खडे हो’, ‘अपलम चपलम’, ‘रेशमी सलवार’,  ‘जानू जानू री’, ‘ओ चाँद जहाँ वो जाए’, ‘मन क्यूँ बहका’, ‘तेरी महफील में’, ‘कोई आएगा, हमरे गाव कोई आएगा’,   ‘निगा हों से दिल का पैगाम आया है’, ‘आँखिया भूल गयी सोना’, ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ अशी लोकप्रिय गीते आणि शास्त्रीय संगीतावर आधारित काही गाण्यांचा समावेश होता.

शास्त्रीय संगीतावर आधारित संपूर्णपणे महिला कलाकारांनीच सादर केलेला असा हा सुरेल कार्यक्रम होता. यात सहभाग असलेल्या सर्व महिला आपापल्या क्षेत्रात पदवीधर व उच्च पदवीधर असून, संगीत क्षेत्रातही उत्कृष्ट व सर्व परिचित अशा आहेत. हा कार्यक्रम दृक-श्राव्य पद्धतीने सादर करण्यात आला. सुवर्णकाळातील वसंत देसाई, सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन यांच्यापासून नौशाद यांच्यासारख्या संगीतकारांचे संगीत असलेली गीते सादर झाली. लता-आशा, लता-अमीरबाई कर्नाटकी, शमशाद बेगम अशा अनेक गायिकांची गीते रसिकांना मोहवून गेली.

सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम
जून २०१६मध्ये भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम सुरू झाले. लोककला, लोकसंगीत, आदिवासी नृत्य, जागरण गोंधळ, भक्ती रंग, कीर्तन जुगलबंदी, कलगी तुरा, भेदीक लावणी, अभंग, गवळण, नाट्यगीते, लोककलेतील तालरंग, शंख वादन, ‘ती’ची गाणी, वारकरी सांप्रदायिक कीर्तन, नांदी रंग, भरतनाट्यम असे विविध कार्यक्रम सादर झाले आहेत. नुकताच सादर करण्यात आलेला ‘कजरा मोहोब्बतवाला’ हा ५० वा कार्यक्रम असल्याचे विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविकात सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link