Next
कोल्हापूर आयकर कार्यालयातर्फे रत्नागिरीत कार्यशाळा
BOI
Wednesday, May 29, 2019 | 05:50 PM
15 0 0
Share this article:

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयकरासंदर्भात माहिती देताना कोल्हापूरच्या आयकर अधिकारी सुनिता लोखंडे.रत्नागिरी : आयकर विभाग, भारत सरकार यांनी आर्थिक वर्ष २०१८-१९या कालावधीसाठी फॉर्म नं.१६ व टीडीएस स्टेटमेंट २४ क्यु यामध्ये बदल केल्याबाबतची अधिसूचना १२ मे २०१९पासून अंमलात आली आहे. या विषयी जनजागृती करण्यासाठी कोल्हापूर आयकर कार्यालयाच्या टीडीएस विभागातर्फे येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आज (२९ मे २०१९) कार्यशाळा घेण्यात आली. 

रत्नागिरी जिल्ह्यातील ट्रेझरी ऑफिस, जिल्हा परिषदमधील डीडीओ तसेच महाविद्यालयातील कर्मचारी या वेळी उपस्थित होते. आयकर अधिकारी सुनिता लोखंडे यांनी फॉर्म नं. १६ व टीडीएस स्टेटमेंट २४क्यु मधील झालेल्या बदलांची सविस्तर माहिती दिली. हे बदल हे २०१८-१९ या आर्थिक वर्षापासून अंमलात येणार असून, सर्व डीडीओंनी सहकार्य करावे व फॉर्म क्र. १६ व्यक्तिगतांना द्यावेत; तसेच टीडीएस स्टेटमेंट २४ क्यु वेळेत भरून दंडात्मक कारवाई टाळण्याचे आवाहन केले.

आयकर कार्यशाळेत बोलताना डॉ. मकरंद साखळकर. शेजारी आयकर अधिकारी सुनिता लोखंडे, सुमेधा पाटील, शरद पेंडसे आदी.

शरद पेंडसे यांनी ऑनलाइन प्रात्यक्षिके दाखविली व उपस्थितांच्या शंकांचे निरसन सुनिता लोखंडे यांनी केले. ही कार्यशाळा पुणे टीडीएस विभागाचे आयकर आयुक्त आदर्शकुमार मोदी, व अतिरिक्त आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कार्यशाळेसाठी कोल्हापूर येथील आयकर निरीक्षक सुमेधा पाटील, लता घाडगे, प्रदीप यादव, स्वाती कसबेकर, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर व विजय काकतकर यांचे सहकार्य लाभले.

दुसर्‍या छायाचित्रात विविध शासकीय आस्थापनांमधील कर्मचारी, अधिकारी.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search