Next
जयंती कठाळे यांचे मार्गदर्शन १० ऑगस्ट रोजी
प्रेस रिलीज
Wednesday, August 08 | 04:00 PM
15 0 0
Share this story

जयंती कठाळेपुणे : मराठी उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी कार्यरत असणाऱ्या मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरमच्या (एमईएन) तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हॉटेल पूर्णब्रह्मच्या संचालिका जयंती कठाळे यांचे विशेष मार्गदर्शन आयोजिले आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनस्विनी फूडचे संचालक मनीष शिरसाव, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युनिटेक अॅटोमेशनचे भरत भुजबळ उपस्थित राहाणार आहेत.

हा कार्यक्रम १० ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी पाच वाजता घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. या वेळी फोरमतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘आदर्श उद्योजक-उद्योजिका’ पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार असून, सुपनेकर भोजन प्रबंधच्या संचालिका मीना सुपनेकर, मेगाक्राफ्ट एंटरप्रायझेसच्या संचालिका अंजली आपटे, राकेश ट्रान्सफॉर्मर इंडस्ट्रीजचे संचालक प्रताप जाधव आणि अभिनव फार्मर्स क्लबचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके यांना हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
 
‘मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरम म्हणजे मराठी उद्योजकांनी मराठी उद्योजकांसाठी तयार केलेले व्यासपीठ असून, विविध व्यवसायातील लोकांशी विचारांची देवाणघेवाण करून व्यवसायाची व्याप्ती वाढविणे हा याचा उद्देश आहे. या विचारांतून फोरम काम करत आहे. फोरमतर्फे महिन्याला सभासदांची बैठक घेऊन उद्योजकांना एकमेकांशी जोडले आहे. उद्योजकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते,’ अशी माहिती फोरमचे सुरेंद्र कुलकर्णी, राजेश जोशी यांनी दिली आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
शुक्रवार, १० ऑगस्ट २०१८
वेळ : सायंकाळी पाच वाजता
स्थळ : जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृह, घोले रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Suhas Phadke About 130 Days ago
स्त्यूत्य उपक्रम. पुरस्कारार्थी सौ मीना सुपनेकर अस नाव पाहीजे, सुपनेरकर अस झालय. नावाःची काळजी घेणे आवश्यक वाटते.
0
0

Select Language
Share Link