Next
नंदुरबारमध्ये अवघड प्रसूती कमी खर्चात यशस्वी
कृपासिंधा रुग्णालयातील डॉक्टर्स टीमची किमया
शशिकांत घासकडबी
Monday, November 05 | 12:56 PM
15 0 0
Share this story

नंदुरबार : दवाखान्यात जायचे म्हटले, की सर्वांच्याच पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही. त्यातून एखादा गंभीर आजार किंवा अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, प्रसूती असेल, तर रुग्णासकट त्याचे नातेवाईकही प्रचंड तणावाखाली वावरत असतात. खासगी दवाखाना असेल, तर खर्चाचा ताण आणि सरकारी दवाखाना असेल तर योग्य उपचार व वागणूक मिळेल की नाही, याचे दडपण अशा दुहेरी कात्रीत रुग्ण व त्याचे नातेवाईक सापडलेले असतात. परंतु अशा रुग्णांना दिलासा देणारी एक घटना नुकतीच नंदुरबारमध्ये काही होतकरू व संवेदनशील डॉक्टरांच्या समूहाकडून अनुभवास आली. अत्यंत अवघड प्रसूती नंदुरबारमधील कृपासिंधू रुग्णालयात डॉक्टरांच्या चमूने कमी खर्चात व सुलभ रीतीने पार पाडली. 

नंदुरबारमधील कृपासिंधू रुग्णालयात काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील आमखेल येथील सर्वसामान्य कुटुंबातील विवाहित महिला दुसऱ्या प्रसूतीसाठी दाखल झाली. तिचे पहिले सिझेरियन धुळे येथील हॉस्पिटलमध्ये झाले होते. कन्जेनायटल कम्प्लीट हार्ट ब्लॉकमुळे तिचा पल्स रेट (नाडी) केवळ ४० बीपीएम एवढाच होता. त्यामुळे पहिल्या खेपेस तिची प्रसूती पेसमेकर लावून करण्यात आली होती. त्यासाठी तिच्या कुटुंबीयांना परिस्थिती नसतानाही लाखो रुपये मोजावे लागले. 

दुसऱ्या खेपेला मात्र एवढा खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. त्यांनी महिलेला नंदुरबार येथील कृपासिंधू रुग्णालयात दाखल केले. तेथील स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. अविनाश पाटील यांनी महिलेची समस्या व परिस्थिती लक्षात घेऊन पेसमेकरशिवाय अल्प खर्चात प्रसूती कशी करता येईल याचा विचार केला. ‘स्पेशल अॅनास्थेशिया क्विक इन क्विक आउट’ पद्धतीने प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक भूलतज्ज्ञ डॉ. संदीप बोरसे, डॉ. किरण वानखेडे, फिजिशियन डॉ. रोशन भंडारी, डॉ. विनय पटेल यांच्या सहकार्याने ही खर्चिक व अवघड प्रसूती त्यांनी अत्यंत अल्प खर्चात यशस्वी केली. त्यामुळे त्या रुग्ण महिलेच्या कुटुंबीयांना फार मोठा आधार मिळाला. वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी ही घटना नक्कीच दिशा देणारी ठरेल. त्याचबरोबर सर्वसाधारण रुग्णांच्या मनातदेखील आशेचा किरण निर्माण करणारी ही घटना आहे. सर्वच डॉक्टर वाईट नसतात, हा विश्वास यातून निर्माण होण्यास मदत होईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Raosaheb patil About 70 Days ago
कृपासिंधु हाॕस्पीटल नंदुरबार डाॕ.टीम व डाॕ.अविनाश पाटील.यांचे खुप खुप अभिनंदन ....
0
0
Mahendra kokani About 75 Days ago
Team la shubhecchha!!!
1
0
manjula patil About 75 Days ago
Mast Ambadnya Nathsvidh
1
0

Select Language
Share Link