Next
‘सिंहगड’च्या रूपाली गोंधळीचा सुवर्णवेध
BOI
Wednesday, February 27, 2019 | 04:43 PM
15 0 0
Share this article:

रूपाली गोंधळी हिचा सत्कार करताना लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई, प्राचार्य डॉ. मिलिंद रोहोकले, मार्गदर्शक मुकेश गुरदाळे व क्रीडा संचालक डॉ. अनिल कमलापुरे आदी

कुसगाव : सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कुसगाव येथील एन. बी. नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्सची विद्यार्थीनी रूपाली गोंधळी हिने ओरिसातील भुवनेश्वर येथे झालेल्या आंतरविद्यापीठ तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड राउंड प्रकारात सांघिक सुवर्णपदक पटकाविले.

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व नाशिकचे के. टी. एच. एम. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या आंतर विभागीय धनुर्विद्या स्पर्धेतही तिने कंपाउंड राउंड प्रकारात चौथा क्रमांक पटकावून पुणे विद्यापीठाच्या धनुर्विद्या संघामध्ये स्वतःचे स्थान निश्चित केले होते. तिच्या या यशाबद्दल लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई, प्राचार्य डॉ. मिलिंद रोहोकले, मार्गदर्शक मुकेश गुरदाळे व क्रीडा संचालक डॉ. अनिल कमलापुरे यांनी तिचे अभिनंदन केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search