Next
ढेपे वाड्यात ‘सूर मिलाफ’ला चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, January 28, 2019 | 05:35 PM
15 0 0
Share this article:



पुणे : मुळशीतील गिरीवन येथील ढेपे वाड्यात पाश्चिमात्य आणि भारतीय सुरांचा संगम असणाऱ्या ‘सूर मिलाफ’ या कार्यक्रमाचे आयोजन २७ जानेवारी २०१९ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.

भारतीय संस्कृतीतील कला जोपासण्यासाठी आणि ती वृद्धिंगत होण्यासाठी पूर्व आणि पश्चिमेकडील गायन आणि तालवाद्यांतील सुरांचा एक अनोखा मिलाफाचा कार्यक्रम रसिकांसाठी आयोजित करण्यात आला होता. उदय ईस्ट-वेस्ट फ्युजन बॅंडने हा कार्यक्रम सादर केला. झेक रिपब्लिक देशातील जॉन कॅन्कले (क्सोफोन बासरी), विनीत अंतुरकर (गायन, गिटार), भूपाल लिमये (मेंडोलीन), नीरज प्रेम (कॅनडा), उदय रामदास (गायन, तबला) या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ‘ढेपे वाडा’चे संचालक नितीन व ऋचा ढेपे यांनी कलाकारांचा सत्कार केला.



जुन्या मराठी वाडा संस्कृतीप्रमाणे बांधलेल्या ढेपे वाड्याच्या दिवाणखान्यात भारतीय बैठकीवर बसलेल्या रसिकांसमोर ही फ्युजन मैफल रंगली. हंसध्वनी, चारुकेशी, खमाज या भारतीय रागदारीवर आधारित रचना सादर झाल्या. जॅझ, वेस्टर्न, क्लासिकल रचनाही या कलाकारांनी सादर केल्या. आफ्रिकन, मराठी लोकसंगीतही रसिकांच्या मनाला भावले. भैरवी रागाने मैफलीची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा ढेपे यांनी केले.

या प्रसंगी बोलताना जॉन कॅन्कले म्हणाले, ‘भारतीय संस्कृती आणि संगीत महान असून, ढेपे वाड्यामुळे जुन्या एकत्रित कुटुंब पद्धतीचा प्रत्यय येतो. वेगळ्या वातावरणात या मैफलीचा आनंद वेगळाच होता.’

‘ढेपे वाडा’चे संचालक नितीन ढेपे म्हणाले, ‘संगीत आणि कलेला भाषा, देशाच्या सीमा नसतात हेच या मैफलीमुळे सिद्ध झाले. अशा आगळ्यावेगळ्या संकल्पना ढेपे वाड्यात सादर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search