Next
‘व्होडाफोन’तर्फे वारकऱ्यांसाठी दोन मोबाइल व्हॅन
प्रेस रिलीज
Thursday, July 05, 2018 | 04:57 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘व्होडाफोन या भारतातील आघाडीच्या दूरसंचार कंपनीने पंढरपूरच्या आषाढी यात्रेत वारकऱ्यांना सेवा पुरविण्याची आपली दरवर्षीची योजना जाहीर केली. पुणे ते पंढरपूर अशी पायी वारी करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना ‘व्होडाफोन’च्या मोफत सेवा पुरविण्यासाठी दोन मोबाइल व्हॅन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. गेली पाच वर्षे ही सेवा पुरविणाऱ्या ‘व्होडाफोन’ची एक व्हॅन ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत व दुसरी तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत असेल,’ असे ‘व्होडाफोन’तर्फे सांगण्यात आले.

या व्हॅनमध्ये मोफत कॉलिंगची सोय, मोबाइल फोन चार्जिंगचे पॉइंट्स, रिचार्ज व्हाउचर्स व ‘एम-पेसा’ ही पैसे ट्रान्स्फर करण्याची सेवा आदी सुविधा उपलब्ध असतील. वारकऱ्यांना वारीत असतानादेखील आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधता यावा, हा यामागचा उद्देश आहे. पालखी मार्गावरील सर्व मुक्कामी ठिकाणी वारकऱ्यांना या सेवांचा लाभ घेता येईल. प्रत्येक व्हॅनमध्ये आठ फोन, ५० चार्जिंग पॉइंट्स ठेवण्यात येतील.

यंदा या मोबाल व्हॅनमध्ये एलईडी स्क्रीनही उपलब्ध करून देण्यात येत आहे. या स्क्रीनवर वारकरी बातम्या, भक्तीगीते, भजने व धार्मिक चित्रपट पाहू शकतील. ‘व्होडाफोन प्ले’ या व्होडाफोनच्या मनोरंजनासाठीच्या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हे कार्यक्रम सादर करण्यात येतील. वारकऱ्यांना केवळ बातम्याच नव्हे, तर मनोरंजनाच्या सोज्वळ कार्यक्रमांचा यातून आनंद घेता येईल.

‘व्होडाफोन’ची ही पंढरपूर यात्रेची वारी २०१३ पासून सुरू झाली. तेव्हापासून ‘व्होडाफोन’ने लाखो वारकऱ्यांना ‘व्होडाफोन मोबाइल व्हॅन’च्या माध्यमातून मोफत कॉलिंगची सुविधा दिलेली आहे. या व्हॅन्सचे उद्घाटन तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज पालख्यांच्या विश्वस्तांच्या हस्ते व ‘व्होडाफोन इंडिया’चे महाराष्ट्र-गोवा परिमंडळाचे प्रमुख आशिष चंद्रा यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

या उपक्रमाबद्दल बोलताना आशिष चंद्रा म्हणाले, ‘सलग सहाव्या वर्षी पंढरपूर यात्रेला जाता येणार असल्याचा ‘व्होडाफोन’ला अभिमान आहे. ही यात्रा एकमेवाद्वितीय असून, सर्व महाराष्ट्राला ती एकत्र आणते. राज्यातील कानाकोपऱ्यातील गावांमधून लाखो भाविक एकत्र येतात व ४५० किलोमीटरचे अंतर पायी चालतात, ही दरवर्षीची अद्भूत घटना आहे. ‘मोबाइल व्हॅन’च्या माध्यमातून या यात्रेला मदत करण्यास ‘व्होडाफोन’ला नेहमीच आनंद वाटतो. वारकऱ्यांना कुटुंबियांशी संवाद साधण्यात या व्हॅनचा हातभार लागतो. यंदा ‘व्होडाफोन प्ले’देखील वारकऱ्यांना त्यांच्या मुक्कामी मनोरंजनाचा आनंद देऊ शकणार आहे. २१ दिवसांच्या वारीत वारकऱ्यांना ‘व्होडाफोन’च्या एकसंध, कोणताही अडथळा नसलेल्या व विश्वासार्ह अशा नेटवर्कचा अनुभव घेता येईल. वारकऱ्यांच्या भक्तीमय मार्गाने त्यांच्यासोबत आम्ही यापुढेही असेच जात राहू.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link