Next
‘आयरोबोट’द्वारे ‘रूम्बा ९८०’ची प्रस्तुती
प्रेस रिलीज
Thursday, June 14, 2018 | 10:51 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘आयरोबोट’ने नवीन वायरलेस रोबोटिक व्हॅक्युम क्लीनर ‘रूम्बा ९८०’ भारतीय बाजारात दाखल केले असून, हे उपकरण कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय अडकलेली धूळ आणि मळ साफ करते. वाय-फायशी संलग्न आयओटी उपकरणासोबत कोपरे साफ करण्यासाठी खासप्रकारे तयार केलेल्या ब्रशसह खोलीच्या काना-कोपऱ्यातून घाण आणि कचरा साफ करते. हे उपकरण स्मार्टफोनमधील ‘आयरोबोट होमअॅप’द्वारे सुरू करता येऊ शकते. हे उपकरण अॅमेझॉन इंडियावर ६१ हजार ४६६ रुपयांत उपलब्ध आहे.

‘रूम्बा ९८०’ हे एक स्टायलिश आणि दणकट रोबो व्हॅक्युम क्लीनिंग उपकरण असून, याची रचना अल्ट्रामॉडर्न आहे. ऑप्टिकल आणि आकॉस्टिक सेन्सर, तसेच डर्ट डिटेक्ट टेक्नॉलॉजीमुळे या उपकरणाची कामगिरी गालिचे आणि सतरंज्यांसारख्या अति धूळ असलेल्या ठिकाणी काम करताना आपोआप अधिक चांगली होते. यात आयअडॅप्ट नेव्हीगेशन टेक्नॉलॉजी आहे, जे या उपकरणाला प्रती सेकंद ६० पर्यंत निर्णय घेण्यास सक्षम बनवते; तसेच सफाई करताना घरातील उंचवटे, फर्निचर आणि इतर सामानाचा अंदाज देते.

‘रूम्बा ९८०’च्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांमध्ये डर्ट डिटेक्ट टेक्नॉलॉजी, आयअॅडॅप्ट नेव्हीगेशन टेक्नॉलॉजी आणि अॅड्व्हांस्ड सेन्सर्स, १०एक्स द एअर पॉवर, प्रदीर्घ काळ चालणारी बॅटरी आणि स्वयंचलित डॉकिंग, वाय-फाय आणि अॅप कनेक्टीव्हिटी यांचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link