Next
पुणे येथील संशोधकांच्या प्रकल्पाची केंद्राकडून निवड
प्रेस रिलीज
Thursday, November 16 | 03:33 PM
15 0 0
Share this story

पुणे : शेतीला योग्य प्रमाणात आधुनिक सिंचन पद्धतीद्वारे पाण्यात विरघळणारी खते, क्षार द्रव्ये आणि पाणी पुरविण्याचा सेन्स इट आऊट कंपनीच्या माध्यमातून ‘इलेक्ट्रॉनिक इरिगेशन’च्या संशोधन प्रकल्पाची केंद्र सरकारच्या कौशल्य प्रशिक्षण विभागाच्या निधी प्रयास अनुदानासाठी निवड झाली आहे. डॉ. अभय हाके, जसविंदर सिंग या पुण्यातील युवा संशोधकांच्या संशोधनाला त्यामुळे पाठबळ मिळाले आहे.

‘ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन’तर्फे सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना भविष्यात स्वतःचे इन्क्युबेशन सेंटर असावे व त्यातून नवीन उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारचे 'इन्क्युबेशन' हे आयआयटीमध्ये अस्तित्वात आहे.

विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान विषयक नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यावसायिक रूप देण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘निधी प्रयास’ हे अनुदान दिले जाते. डॉ. हाके आणि सिंग यांनी शेतीला योग्य प्रमाणात आधुनिक सिंचन पद्धतीद्वारे खते आणि पाणी पुरविण्यासाठी सेन्स इट आऊट या कंपनीच्या माध्यमातून हे संशोधन सुरू केले होते. हा आधुनिक प्रणालीचा ‘वॉटर मॅनेजमेंट इरिगेशन प्रोजेक्ट’ आहे.

आत्तापर्यंत इस्त्रायली संशोधक अशा प्रकारच्या प्रणालीवर संशोधन करीत होते; मात्र ‘सेन्स इट आऊट’च्या माध्यमातून केलेले संशोधन ही पूर्णपणे भारतीय प्रणाली आहे. ही सर्व आर्थिक स्तरातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल.

भारतासारख्या कृषीप्रधान देशातील पाणी व्यवस्थपनासाठी अभियंते, संस्था पुढे येणे गरजेचे आहे. म्हणून मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने या प्रकल्पाला बळ दिले. डॉ. अभय हाके आणि जसविंदर सिंग यांना राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक ​डॉ. रोशन येन्द्री आणि डॉ. मनिषा प्रेमनाथ यांच्या हस्ते ‘निधी प्रयास’चा प्रस्ताव हस्तांतरीत करण्यात आला. ​या वेळी व्हेंचर इन्क्युबेशन सेंटरचे ​डॉ. पीयूष जोशी उपस्थित होते​. ​

‘हे संशोधन येत्या सहा महिन्यांत पूर्ण होईल,’ असे डॉ. हाके यांनी सांगितले. राष्ट्रीय रासायनिक शाळेच्या ​(एनसीएल) व्हेंचर इन्क्युबेशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम नुकताच झाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link