Next
‘महक’तर्फे ‘शौर्या तुला वंदितो’
प्रेस रिलीज
Tuesday, July 24 | 04:52 PM
15 0 0
Share this story

पुणे : कारगिल विजय दिवसानिमित्त प्रसिद्ध गायिका मनीषा लताड यांच्या महक संस्थेतर्फे ‘शौर्या तुला वंदितो‘’ हा देशभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम गुरुवार, २६ जुलै २०१८ रोजी सकाळी १० वाजता भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात होणार आहे.

राष्ट्रीय छात्र सेना व सह्याद्री प्रतिष्ठान यांच्यातर्फे मनीषा लताड यांना ‘कमांडर’ हा सन्मान महावीरचक्र विजेते दिगेंद्र कुमार, शौर्यचक्र विजेते रमेश बाहेकर व अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

दुश्मनांच्या गोळ्यांनी स्वतःच्या शरीराची चाळण झाली असतानाही मृत्यूलाही थांबवत नापाक कुरापती करणाऱ्या ४८ पाकिस्तानी सैनिकांचा पाडाव करीत विजय प्राप्त करणाऱ्या महावीरचक्र विजेते कारगिल हिरो दिगेंद्र कुमार यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळणार आहे.

कार्यक्रमाविषयी :
दिवस :
गुरुवार, २६ जुलै २०१८
वेळ : सकाळी १० वाजता
स्थळ : अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link