Next
फाटक हायस्कूलच्या ३८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
BOI
Tuesday, August 07, 2018 | 06:05 PM
15 1 0
Share this story

फाटक हायस्कूलमधील शिष्यवृत्ती मिळविलेले विद्यार्थी. मधल्या रांगेत बसलेले संस्थेचे ध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, अॅड. भावे, मुख्याध्यापिका शुभांगी वायकूळ, दाक्षायणी बोपर्डीकर आणि मार्गदर्शक शिक्षक.

रत्नागिरी :
 ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे’तर्फे फेब्रुवारी २०१८मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरीतील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या फाटक हायस्कूलमधील ३८ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या शाळेतील आठवीतील अथर्व सुर्वे जिल्ह्यात दुसरा, तर पाचवीतील अद्वैत बर्वे नववा आला आहे. गुणवत्ता यादीतील शहरातील सर्वाधिक विद्यार्थी या शाळेचे आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांची सविस्तर यादी खाली दिली आहे.

पाचवीच्या विद्यार्थ्यांना संतोष भेलेकर, पूर्वा जाधव, सुनीता गावित, भास्कर झोरे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले, अनिल आग्रे, प्रकाश देवरुखकर, प्रीती हातिसकर, दाक्षायणी बोपर्डीकर यांनी आठवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका शुभांगी वायकूळ, दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, सचिव दाक्षायणी बोपर्डीकर, उपाध्यक्ष अॅड. विनय आंबुलकर, अॅड. प्रभाकर करमरकर आणि सदस्य जयंत प्रभुदेसाई यांनी या यशाबद्दल विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

शिष्यवृत्ती मिळविलेले पाचवीतील विद्यार्थी आणि जिल्हा गुणानुक्रम :
अद्वैत बर्वे - ९, आदित्य पानगले - २६, अभिषेक पाटील - २९, स्वरा लिंगायत - ३२, कणाद कुलकर्णी - ३६, खुशी भाके - ३८, वेदांती लिमये - ५०, तेज बोरकर - ६४, मधुरा करमरकर - ६५, समृद्धी कदम - ६६, सानिका केळकर - ७०, प्रतीक कीर - ७४, ओजस अभ्यंकर - ९०, स्वानंद मुळ्ये - १०८.

अथर्व सुर्वेशिष्यवृत्ती मिळविलेले आठवीतील विद्यार्थी आणि जिल्हा गुणानुक्रम :
अथर्व सुर्वे - २, कल्पजा जोगळेकर - ६, अथर्व शेंडे - १०, गिरिजा आंबर्डेकर - ११, रुची भाटकर - २८, गायत्री हळदवणेकर - ३०, सई पवार - ३४, श्रीश सोमण - ३५, ओम जोशी - ३६, पार्थ गुरव - ४५, प्रणव जोग - ५४, राज वायंगणकर - ५६, केदार दामले - ५७, श्रुजल पारकर - ६०, भक्ती सावंत - ६८, वेदांग मोरे - ६९, चिन्मय पिलणकर - ७०, अभिषेक तांबे - ७१, सुजल मयेकर - ७२, वरुण भिडे - ८०, विशाखा गोठणकर - ८५, श्रेया बोरवणकर - ८७, हर्ष मुळे - ९१, सार्थक भुते - ९६.

(राज्याच्या निकालाची सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. रत्नागिरीतीलच पटवर्धन हायस्कूलच्या निकालाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. दामले विद्यालयाच्या निकालाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link