Next
आशादीप संस्थेत जिलेबी वाटप
BOI
Saturday, July 14 | 04:52 PM
15 0 0
Share this story



रत्नागिरी : ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील आशादीप या निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले.

रत्नागिरी जिल्हाध्यक्ष कांचन मालगुंडकर यांनी मुलांशी संवाद साधला. या वेळी कोकण विभागप्रमुख गुरुनाथ चौघुले, जिल्हा उपाध्यक्ष सचिन सावंत, किरण खेडेकर, संदेश पवार, जयेश चव्हाण, दिनेश भातडे, शुभम वाडकर, मंथन मुरकर, हर्षल कुलकर्णी, आदेश मयेकर, यश मयेकर, अक्षय लिंगायत, संकल्प युनिक फाउंडेशनचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष शकील गवाणकर आदी उपस्थित होते.

‘वाढदिवसाचे निमित्त साधून ‘आशादीप’मध्ये येऊन येथील मुलांना जिलेबी वाटप केले त्याबद्दल आम्ही ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर्स असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेचे आभारी आहोत,’ अशी भावना या वेळी संस्था चालक दिलीप रेडकर यांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link