Next
दिव्यांगांना पुनर्वसनाची संधी देणे हे ‘अवेकनिंग ट्रस्ट’चे अभिमानास्पद कार्य
ट्रस्टच्या आर्ट गॅलरीच्या नामकरण सोहळ्यावेळी रघुनाथ बामणे यांचे प्रतिपादन
BOI
Monday, December 10, 2018 | 12:37 PM
15 0 0
Share this story

अवेकनिंग ट्रस्टच्या आर्ट गॅलरीचे नामकरण विश्वास पेठे जॉय आर्ट गॅलरी असे करण्यात आले. त्या प्रसंगी उपस्थित मान्यवर.

रत्नागिरी : ‘दिव्यांगांनी विशेष शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण घेतले, तरी कामाची संधी मिळत नाही तोपर्यंत त्यांचे खरे पुनर्वसन होत नाही. ही संधी अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्टच्या गोविंद आणि वत्सला रेगे हस्तकला केंद्रामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांगांना मिळत असून, रत्नागिरीसाठी हे अभिमानास्पद आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे यांनी केले.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अवेकनिंग ट्रस्टच्या आर्ट गॅलरीचे नामकरण विश्वास पेठे जॉय आर्ट गॅलरी असे करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचा समाजकल्याण अधिकारी डॉ. यतीन पुजारी, मत्स्य महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. स्वप्नजा मोहिते, ट्रस्टच्या सचिव शमीन शेरे, अध्यक्ष डॉ. शाश्वत शेरे, कोषाध्यक्ष वनिता परांजपे, डॉ. रश्मी आठल्ये, डॉ. रवींद्र गोंधळेकर, डॉ. मेधा गोंधळेकर, प्रभा जोशी, समाजकल्याण निरीक्षक श्री. ढेकणे आदी उपस्थित होते.समाजकल्याण अधिकारी डॉ. पुजारी यांनी ट्रस्टच्या कलात्मक वस्तूंच्या गुणवत्तेची प्रशंसा केली. अशा उत्तम दर्जाच्या वस्तूंना भारतातील मोठ्या शहरांतच नाही, तर परदेशांतही मोठी मागणी राहील, असे म्हणाले.

मत्स्य महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. मोहिते यांनी कलेमुळे जीवनात आनंद निर्माण होतो, असे सांगून ‘रेझिन’ माध्यमातील रंगकामाचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यात दिव्यांग कलाकार अनिकेत चिपळूणकर यालाही सहभागी केले; तसेच यापुढेही आपण मार्गदर्शन करत राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.प्रारंभी ट्रस्टच्या सचिव शमिन शेरे यांनी पुनर्वसन केंद्राच्या स्थापनेची माहिती दिली. दिव्यांगांच्या कौशल्याला मध्यवर्ती ठेवून दर्जेदार उत्पादन कसे केले जाते या प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. अध्यक्ष डॉ. शेरे यांनी चित्रकार विश्वास पेठे यांनी अमेरिकेहून पाठविलेला संदेश वाचून दाखविला. पेठे यांनी अपंगत्वामुळे आलेल्या नैराश्यातून कलेच्या आराधनेमुळे कसे बाहेर आलो, याविषयी अनुभव लिहिला होता. दिव्यांगांच्या सुप्त कलागुणांना मुक्त करण्याच्या ‘अवेकनिंग’च्या कार्याचे कौतुक म्हणून देणगी दिल्याचे या संदेशात नमूद करण्यात आले होते.(अवेकनिंग चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याची सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr Sharad Prabhudesai About 104 Days ago
keep it dr mr and mrs shere. once again best luck.
0
0

Select Language
Share Link