Next
लोहगाव विमानतळावर महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानावर आधारित म्युरल
‘बीएनसीए’चा उपक्रम
BOI
Friday, October 04, 2019 | 12:00 PM
15 0 0
Share this article:


पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त लोहगाव विमानतळावर त्यांच्या शिकवणीवर आधारित भित्तिशिल्प (म्युरल) उभारण्यात आले आहे. महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या ‘डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमन’च्या (बीएनसीए) २५ विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी हे म्युरल तयार केले आहे.

विमानतळ प्राधिकरणाच्या अंजनी कुमारी यांनी मांडलेल्या या संकल्पनेला ‘बीएनसीए’च्या विद्यार्थीनी आणि प्राध्यापकांनी मूर्त रूप दिले. ‘बीएनसीए’मधील सहाय्यक प्राध्यापक आर्किटेक्ट अमृता बर्वे, प्रा.सायली कुलकर्णी, प्रा. निकिता जोशी-गुरव, प्रा. देवा प्रसाद आणि प्रा. सायली अंधारे यांचे मार्गदर्शन या विद्यार्थिनींना लाभले.

याबाबत अधिक माहिती देताना ‘बीएनसीए’चे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप म्हणाले, ‘गांधीजींच्या तत्त्वज्ञानातील सत्य, एकी, साधेपणा, शांती, आणि अहिंसा या मूल्यांशी तरुण पिढी जोडली जावी, अशी आमची यामागची भूमिका आहे. अशा उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही समाजाला काहीतरी चांगले देण्याचा प्रयत्न करत आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search