Next
‘वैचारिक प्रगल्भतेतूनच महिला सक्षमीकरण शक्य’
‘मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरम’तर्फे आदर्श उद्योजक पुरस्कार वितरण
प्रेस रिलीज
Friday, August 17, 2018 | 04:30 PM
15 0 0
Share this article:

‘मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरम’तर्फे नुकतेच आदर्श उद्योजक पुरस्कार वितरण करण्यात आले. या वेळी शिरीष देशपांडे, जयंती कठाळे, प्रताप जाधव, ज्ञानेश्वर बोडके, अंजली आपटे, मीना सुपनेरकर, भरत भुजबळ, मनीष शिरसाव व सुरेंद्र कुलकर्णी.

पुणे : ‘महिला सक्षमीकरण केवळ चर्चा करून होत नाही. त्यासाठी वैचारिक प्रगल्भततेतून त्यांच्या मनगटात बळ भरण्याचे काम पुरुषांनी करावे. व्यवसायातील यशामागे आपल्या जोडीदाराची साथ अतिशय महत्त्वाची असते. बाईच्या मनातील कल्पनेला प्रोत्साहन दिले, तर तीही मोठा व्यवसाय उभारू शकते,’ असे प्रतिपादन मनस्विनी फूड आणि हॉटेल ‘पूर्णब्रह्म’च्या संचालिका जयंती कठाळे यांनी केले. 

मराठी उद्योजकांच्या व्यवसाय वृद्धीसाठी कार्यरत ‘मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरम’च्या (एमईएन) तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी ‘मनस्विनी फूड’चे संचालक मनीष शिरसाव, ‘युनिक अॅटोमेशन’चे भरत भुजबळ, फोरमचे सुरेंद्र कुलकर्णी, शिरीष देशपांडे आदी उपस्थित होते. 

‘सुपनेरकर भोजन प्रबंध’च्या संचालिका मीना सुपनेरकर, ‘मेगाक्राफ़्ट एंटरप्रायझेस’च्या संचालिका अंजली आपटे, ‘राकेश ट्रान्सफॉर्मर इंडस्ट्रीज’चे संचालक प्रताप जाधव आणि ‘अभिनव फार्मर्स क्लब’चे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके यांना यंदाचा ‘आदर्श उद्योजक-उद्योजिका’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. फोरमच्या बैठकांसाठी सभागृह उपलब्ध करून देणारे जयंत कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला. 

जयंती कंठाळे
जयंती कठाळे म्हणाल्या, ‘एकमेकांच्या सहकार्याने व्यवसाय उभारता येतो. आपल्यातील ठिणगीला आग लागली पाहिजे. लोक काय म्हणतील, याचा विचार सोडून उभे राहिले पाहिजे. मराठी उद्योजकांनी जागतिक स्तरावर जाऊन काम केले पाहिजे. आज ‘पूर्णब्रह्म’ जगभरात सात्विक भोजन देण्याचे काम करीत आहे. येत्या काळात जगभरात पाच हजार शाखा उघडणार आहोत. कार्यक्षेत्र विस्तृत करतानाच व्यवसायात मूल्य जपावीत.’

भरत भुजबळ म्हणाले, ‘‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ या मानसिकतेतून आपण बाहेर पडून, व्यवसायाकडे वळावे. व्यावसायिकांनी एकमेकांना पूरक काम केले पाहिजे. त्यातूनच आपण एकत्रित प्रगती करू शकतो.’

मीना सुपनेरकर, अंजली आपटे, प्रताप जाधव, ज्ञानेश्वर बोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुरेंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. जाई देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार तळेकर यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search