Next
‘ध्येयपूर्तीसाठी कठोर मेहनत, जिद्द हवी’
प्रेस रिलीज
Thursday, April 12, 2018 | 04:09 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘अलीकडच्या काळात भारत हा संधीचे केंद्र बनत असून, औद्योगिक क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. या संधींचा लाभ घेण्यासाठी अभ्यासेतर कौशल्य आत्मसात करायला हवीत. आपले ध्येय निश्चित करून त्याच्या पुर्तीसाठी कठोर मेहनत व जिद्द असायला हवी. उद्योजक बनण्याची मानसिकता तरुणांनी अंगीकारावी,’ असे प्रतिपादन अभी ग्रुप ऑफ कंपनीजचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र जोशी यांनी केले.

युथकॉन क्रिएटीव्ह सोल्युशन्स, रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल आणि सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनीरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युथकॉन टेकपर्व २०१८’ राज्यस्तरीय अभियांत्रिकी प्रकल्प स्पर्धेच्या समारोपावेळी डॉ. जितेंद्र जोशी बोलत होते.

या प्रसंगी श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे उपप्राचार्य डॉ. किशोर बोरोले, विभागप्रमुख प्रा. नितीन शेरजे, युथकॉन क्रिएटीव्ह सोल्युशन्सच्या संचालिका प्रज्ञा वाघ, आशिष एकतपुरे, रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयलचे अध्यक्ष विशाल गुंजाळ, सचिव अजय चौधरी, माजी अध्यक्ष प्रशांत देशपांडे, गिरीश देशपांडे व उदय कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.

मेकॅनिकल, कॉम्पुटर, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स व केमिकल शाखेतील द्वितीय, तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. पाच विभागात प्रथम व द्वितीय क्रमांक देण्यात आला. काँप्यूटर विभागात आरएमडी सिंहगड अभियांत्रिकीच्या ‘इंटेलिजेंट फॉल्ट अनालिसिस ऑफ मशीन’ या प्रकल्पाला प्रथम, तर नऱ्हे सिंहगड महाविद्यालयाच्या ‘हार्ट अॅटॅक डिटेक्शन युजिंग ईसीजी अॅनालिसिस’ प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला.

इलेक्ट्रॉनिक विभागात काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘अॅटोमेटेड फ्लेवर मिक्सिंग मशीन’ला प्रथम, तर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘इंडिविज्युअल वेहिकल पोल्युशन मॉनिटरिंग सिस्टीम’ला द्वितीय क्रमांक मिळाला. केमिकल विभागात सिंहगड अभियांत्रिकीच्या ‘बायोडिझेल सजेस्ट’ला प्रथम, तर याच महाविद्यालयाच्या ‘सिंथेसिस ऑफ सॉल्व्ह नॅनोपार्टिकल्स यूझिंग नॅचरल सोर्सेस’ला द्वितीय क्रमांक मिळाला.

मेकॅनिकल विभागात काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘डेव्हलपमेंट ऑफ मल्टीइलेमेंट सस्पेन्शन’ला प्रथम, तर मराठवाडा मित्र मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ‘स्पीड ब्रेकर फॉर स्मूथ ट्रान्सिशन’ला द्वितीय क्रमांक मिळाला. सिव्हिल विभागात नऱ्हे सिंहगड महाविद्यालयाच्या ‘प्रोटोटाइप स्टडीज ऑन परफॉर्मन्स जिओकॅम्पोजिट हिट मीडिया बिहाइंड रिटेनिंग वॉल’ला प्रथम, तर बावधन जेएसपीएम महाविद्यालयाच्या ‘प्रोडक्शन ऑफ बायोडिझेल विथ द हेल्प ऑफ प्लास्टिक वेस्ट’ या प्रकल्पाला द्वितीय क्रमांक मिळाला.

इंडस्ट्री-शिक्षणसंस्था यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी युथकॉन सोल्युशन्सने पुढाकार घेतला असल्याचे प्रज्ञा वाघ यांनी सांगितले. विशाल गुंजाळ यांनी रोटरीच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. उदय कुलकर्णी यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. आशिष एकतपुरे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. नितीन शेरजे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link