Next
‘एआर मिसेस इंडिया’साठी पुण्यातील सात जणींची निवड
प्रेस रिलीज
Thursday, February 07, 2019 | 05:20 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘एआर मिसेस इंडिया शी कॅन, शी विल’ या सौंदर्य स्पर्धेच्या निवडफेरीला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सौंदर्यक्षेत्रात पदार्पण करण्याची सुप्त इच्छा असलेल्या प्रत्येक विवाहित महिलेसाठी ही स्पर्धा हे एक चांगले व्यासपीठ असून, पुण्यात या स्पर्धेची निवड फेरी नुकतीच झाली.

‘बालिकावधू’ मालिकेतील अविका गोर, मनीष रायसिंघन, ‘बिग बॉस’फेम सृष्टी रोडे, विशाल आदित्य सिंग आणि एआर मिसेस इंडिया व एआर एंटरटेनमेंट समूहाच्या सीईओ, प्रसिद्ध टीव्ही निर्मात्या व दिग्दर्शिका निवेदिता बासू या सेलिब्रिटी परीक्षकांनी ही निवड फेरी घेतली.

या निवड फेरीत ३०हून अधिक महिला स्पर्धक सहभागी झाल्या होत्या. यामध्ये नेहा मदान, प्राची ठाकूर, प्रिती सोनडूर, दीपिका गेडमकर, उषा धुमाळे, श्रीजा बॅनर्जी, सरीता जी या महिलांचा यात समावेश आहे.

‘महिलांचे सबलीकरण करण्याच्या दृष्टीने एआर मिसेस इंडिया ‘शी कॅन, शी विल’ ही सौंदर्यस्पर्धा आयोजित केली जाते. प्रसिद्धी, लोकप्रियता आणि यश यांसह मुकूट मिरवण्याची ज्या महिलांची लहानपणापासूनची सुप्त इच्छा असते, त्या विवाहित महिलांना आम्ही या माध्यमातून एक संधी देत आहोत,’ असे एआर एंटरटेनमेंट समूहाचे आणि एआर मिसेस इंडियाचे निर्माते व मालक आशिष राय यांनी सांगितले.

प्रसिद्ध सेलिब्रिटी परीक्षकांसह सर्व मेट्रो शहरांत एआर मिसेस इंडिया स्पर्धेच्या निवड फेऱ्या रंगणार आहेत. भारतभर निवड फेऱ्या झाल्यानंतर मुंबईत अंतिम सामना रंगेल. विवाहित महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांची ताकद देशभर सिद्ध करणे, हा या स्पर्धेमागचा मूळ उद्देश आहे. विजेत्या महिलेला मुकूट व ‘एआर मिसेस इंडिया २०१९’चा टॅग व सरप्राइज भेटवस्तू मिळणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link