Next
पिंपरी येथे आंतराराष्ट्रीय स्टेम सेल परिषद
प्रेस रिलीज
Tuesday, April 02, 2019 | 01:10 PM
15 0 0
Share this article:



पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाअंतर्गत येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रात ३० व ३१ मार्च या कालावधीत तिसऱ्या आंतराराष्ट्रीय स्टेम सेल परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेचे उद्घाटन त्रिपुराचे  (बिहार) माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले.

स्टेम सेलची उत्क्रांती आणि जीवशास्त्रामध्ये केला जाणारा त्यांचा उपयोग व रिजेनेरेटिव्ह मेडिसिन हा परिषदेचा विषय होता. स्टेम सेल बायोलॉजी विषयातील तंत्रावर वैचारिक देवाणघेवाण या परिषदेत करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी डॉ. पाटील यांनी सहभागी शास्त्रज्ञ आणि विद्यार्थाना या क्षेत्रातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, विश्वस्थ आणि कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, डॉ. ब्रिगेडियर अमरजित सिंग उपस्थित होते.



डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी विद्यापीठातील रिजेनेरेटिव्ह मेडिसिन लॅबोरेटरीविषयी सांगून विद्यापीठातील संशोधन आणि संदर्भातील सुविधांची माहिती दिली. आंतराराष्ट्रीय पातळीवरील संशोधक, डॉक्टर्स आणि विद्यार्थी यांना एका मंचावर आणून स्टेम सेल बायोलॉजीविषयी ज्ञानाचे संधारण आणि सामायिकीकरण करणे हा या परिषदेचा उद्देश होता.

ही परिषद आयोजित करण्यासाठी डॉ.  डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डायरेक्टर (रिसर्च) डॉ. रमेश भोंडे, आयोजन समिती अध्यक्ष डॉ. अनंत बागुल, चेअरपर्सन (आयएससीएसजी) डॉ. मनीष खन्ना आणि आयोजन समिती सचिव डॉ. मनोज बनसोडे यांनी मेहनत घेतली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search