Next
ज्ञानदा नाईक
BOI
Saturday, April 21, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

प्रथितयश लेखक आणि कवींकडून उत्तमोत्तम लेख, गोष्टी, कविता, ललित लेखन, प्रवासवर्णनं घेऊन, तसंच अनेक प्रतिभावान चित्रकारांकडून ‘किशोर’ मासिकाला सजवून एक अत्यंत दर्जेदार आणि सकस साहित्य देणारं मासिक अशी ओळख निर्माण करणाऱ्या ज्ञानदा नाईक यांचा २१ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
........
२१ एप्रिल १९५० रोजी जन्मलेल्या ज्ञानदा नाईक या बालसाहित्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रख्यात साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांच्या त्या कन्या. 

मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचं ज्ञान मिळावं, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत ही उद्दिष्टं ठेवून १४ नोव्हेंबर १९७१ साली सुरू झालेल्या ‘किशोर’ मासिकाच्या संपादनाची धुरा वसंत शिरवाडकर आणि वसंत सबनीस यांच्यानंतर ज्ञानदा नाईक यांच्याकडे आली आणि त्यांनी ती अत्यंत यशस्वीपणे सांभाळली. 

मराठी साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी त्यांचाही चांगलाच संपर्क होता. त्यामुळे प्रथितयश लेखक आणि कवींकडून उत्तमोत्तम लेख, गोष्टी, कविता, ललित लेखन, प्रवासवर्णनं यांची ‘किशोर’मध्ये रेलचेल असायची. तसंच विज्ञान, तंत्रज्ञान, नवनवे शोध, पर्यावरण, प्रदूषण अशा सगळ्याच विषयांवरचे लेख त्यांच्या संपादकीय काळात ‘किशोर’नं मुलांसाठी सतत सादर केले. प्रथितयश लेखक-कवींप्रमाणेच अनेक प्रतिभावान चित्रकारांनी मासिकाला सजवलं. त्याचं श्रेय शिरवाडकर आणि सबनीस यांच्याप्रमाणेच ज्ञानदा नाईक यांचंही.

(‘किशोर’ मासिकाचे सर्व जुने अंक http://kishor.ebalbharati.in/archive/ या लिंकवर मोफत उपलब्ध आहेत.)

आदिशक्ती, गोमंतकीय खाद्ययात्रा, जरासे वेगळे, जिवाभावाचा सखा, सुट्टी रे सुट्टी भागंबट्टी, तजेलदार कॅनव्हास, आजीचा गाव, अनमोल गोष्टी, औटघटकेचे राज्य, धाडसी बाबी, गगनाएवढा आनंद, झकास मैत्री, कल्पवृक्षाखाली, महाराष्ट्रातील प्रतिभावंत कलावंत, निवडक किशोर, प्रकाशाच्या वाटा, रेडी स्टेडी गो ऽ ऽ, शहाणे व्हा! - अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(ज्ञानदा नाईक यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link