Next
आगाशे विद्यामंदिरात नवरात्रौत्सवाला प्रारंभ
BOI
Monday, September 30, 2019 | 04:34 PM
15 0 0
Share this article:

कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कीर्तन करताना सौ. विशाखा भिडे. (छायाचित्र : माउली फोटो, रत्नागिरी)

रत्नागिरी :
भारत शिक्षण मंडळाच्या कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात सोमवारपासून (३० सप्टेंबर) नवरात्रौत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. आठवडाभर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तनकार व संस्कृत अभ्यासक विशाखा भिडे यांनी देवीची पूजा करून कीर्तन केले. त्यांच्या कीर्तनाला विद्यार्थी, पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. 

उद्घाटन कार्यक्रमाला शाळा प्रबंधक विनायक हातखंबकर, देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सीएमए उदय बोडस, हार्मोनियमवादक महेश दामले, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम उपस्थित होत्या. सौ. पेठे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात सीएमए बोडस यांनीही मनोगतामध्ये शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले.

नवरात्रौत्सवानिमित्त पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांकरिता सामुदायिक आरती, भजन, आकाशकंदील तयार करणे, नाट्यछटा स्पर्धा, पालकांसाठी सॅलड डेकोरेशन स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

पालक शिक्षक व माता पालक संघ, शाळा व्यवस्थापन समिती यांचे सहकार्य व भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह सुनील वणजू, शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक हातखंबकर यांचे मार्गदर्शन या उपक्रमांना लाभत आहे.

शाळेच्या नाटेकर सभागृहात शारदा देवीची सुरेख मूर्ती प्रतिष्ठापित केली आहे. मूर्तीभोवती पर्यावरणपूरक आरास करण्यात आली आहे. ‘स्वच्छ शाळा, स्वच्छ पटांगण, प्रसन्न ठेवू वातावरण, पृथ्वीला हिरवीगार बनवा, शुद्ध हवेपासून आरोग्य मिळवा, वृक्षारोपण धर्म महान, एक वृक्ष दस पुत्र समान, कापडी पिशवी पर्यावरणाचे रक्षण करी, प्राणी म्हणजे निसर्गाची शोभा त्यांना मारू नका आपल्या लोभा, कचरा करू कमी आरोग्याची मिळेल हमी, वृक्षतोड करू नका,’ अशा घोषणांचे फलक झळकले आहेत.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Parnika mulye About 17 Days ago
खुप मस्त, आणि छान उपक्रम
1
0

Select Language
Share Link
 
Search