Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शिवलिंग मेनकुदळे
प्रेस रिलीज
Monday, June 24, 2019 | 04:23 PM
15 0 0
Share this article:

डॉ. शिवलिंग मेनकुदळेऔंध : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांची नियुक्ती झाली असून, याअगोदर त्यांनी शिरवळ येथील श्रीपतराव कदम महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम पहिले आहे.

डॉ. मेनकुदळे यांनी मराठी विषयांमधून एमएम, एमफिल, पीएचडी पदवी प्राप्त केली असून, रयत शिक्षण संस्थेत गेल्या २४ वर्षांपासून मराठी विषयाचे अध्यापन करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने एमफिल, पीएचडीच्या आठ विद्यार्थ्यांनी पदवी प्राप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय रिसर्च जर्नलमध्ये त्यांचे १९ रिसर्च पेपर प्रकाशित झाले असून, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सेमिनार कॉन्फरन्समध्ये १९ रिसर्च पेपरचे वाचनही केले आहे. 

त्याच प्रमाणे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सेमिनार, कॉन्फरन्समध्ये २६ ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला होता. यूजीसीने मंजूर केलेला एक रिसर्च प्रोजेक्ट त्यांनी पूर्ण केला आहे. मराठी साहित्यातील ११ पुस्तकांमधून त्यांनी लेखन केले आहे. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात त्यांनी विविध कमिट्यांवर काम केले असून, रयत शिक्षण संस्थेच्या विविध कमिट्यांवरदेखील त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अभयसिंह भोसले स्मृती शैक्षणिक पुरस्कार, राष्ट्रीय शिक्षण क्रांती पुरस्कार, बॅरिस्टर पी. जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची प्राचार्यपदी नियुक्ती केली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Dr.Atul choure About 112 Days ago
Very nice
0
0

Select Language
Share Link
 
Search