Next
इंदापूर व दिव्यातील शासकीय निवासी शाळेत मोफत प्रवेश
प्रेस रिलीज
Monday, May 13, 2019 | 02:53 PM
15 0 0
Share this article:

बारामती : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची दिवे येथील (ता. पुरंदर) शासकीय निवासी शाळा, तसेच तरंगवाडी (ता. इंदापूर) येथील शासकीय निवासी शाळा येथे सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील मोफत प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. 

या शाळेत रिक्त जागांसाठी सहावी ते दहावीसाठी अनुसूचित जाती ८० टक्के, अनुसूचति जमाती १० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती पाच टक्के, विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के, अपंग प्रवर्ग तीन टक्के असा आरक्षणानुसार मोफत प्रवेश देण्यात येणार आहे. या निवासी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य, जेवणाची राहण्याची सोय सोई-सुविधा शासनाच्या नियमानुसार मोफत पुरविल्या जातात. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, विद्यार्थी नोंद पत्रिका, चार रंगीत फोटो, आधारकार्ड व बँक पासबुक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क : 
दिवे (ता. पुरंदर) येथील शासकीय निवासी शाळा प्रवेशासाठी : ९१४५६ ६३०२६, ७०२०४ २९४७८ 
तरंगवाडी (ता. इंदापूर) येथील प्रवेशासाठी : ९४२३५ २८६४३, ९९६०६ ४९६१६ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search