Next
साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजन
BOI
Wednesday, December 19 | 01:14 PM
15 0 0
Share this story

पुणे : दर वर्षीप्रमाणे यंदाही साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ आणि २४ डिसेंबरदरम्यान होणाऱ्या या संमेलनाचे हे १८वे वर्ष असून ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. 

रविवार दि. २३ आणि सोमवार दि. २४ डिसेंबर रोजी असे दोन दिवस कोथरुड येथील यशवंतराव नाट्यगृह इथे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्यिक कलावंत संमेलनाचे हे १८वे वर्ष असून संमेलनात रसिकांना विविध कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे आणि ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या गेल ऑमव्हेट यांना 'वाग्यज्ञे' साहित्य व कला गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक दिलीप बराटे यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिष्ठानचे सचिव वि. दा. पिंगळे आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. 

या वेळी बोलताना दिलीप बराटे म्हणाले, ‘दरवर्षीप्रमाणे यंदाही यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड येथे हे संमेलन होणार आहे. यानिमित्त आयोजित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (२३ डिसेंबर) सकाळी साडे नऊ वाजता, सुनील देवरे यांच्या हस्ते होईल, तर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता पुणे शहराच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते होणार आहे. 

त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता, ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link