Next
‘चारा छावण्यांचे संचालन काटेकोरपणे करा’
BOI
Saturday, May 11, 2019 | 12:30 PM
15 0 0
Share this article:


सोलापूर : ‘जिल्ह्यातील चारा छावण्यांचे संचलन काटेकोरपणे करा,’ अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ मे २०१९ रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त दीपक तावरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, उपायुक्त प्रताप जाधव, पुरवठा शाखेच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी यांसह जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, पाणी पुरवठा, जीवन प्राधिकरण, महानगरपालिका, जलसंपदा, महावितरण आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘चारा छावणीतील जनावरांचे लसीकरण करणाबरोबरच लहान जनावरांचे निर्जंतुकीकरण करावे. पशुपालक समितीची स्थापना करून टँकर पाण्याने भरून घेण्यासाठीचे स्रोत निश्चित करा; मात्र टँकरची देयके जीपीएस लॉगबुक तपासूनच द्यावीत. त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे तपासून घ्यावी. टँकरची क्षमता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून खात्री करून घ्यावी. टँकरला अजिबात गळती असू नये. नरेगावरील कामावर मजूर येण्यासाठी नियोजन करावे. बंधाऱ्यातील गाळ काढण्याची कामे घ्यावीत. टँकर भरण्यासाठीच्या स्रोतांच्या परिसरातील वीज पुरवठ्याचे नियमन करताना उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा केली जावी.’ 

जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, ‘पाणी टंचाईच्या गावातून मागणी आल्यास २४ तासांत टँकर दिला जाईल. टँकर मागणी असलेल्या गावांना उपविभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे भेट द्यावी. मागणीत तथ्य असल्यास तत्काळ टँकर द्यावेत.’

छावणी चालक आणि महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना जनावरांच्या बारकोडिंगबाबत प्रशिक्षण देण्याच्या सूचना पुरवठा उपायुक्त धायगुडे यांनी दिल्या. दुधाळ जनावरांची ई-नाम प्रणालीवर नोंदणी करून त्याच्या नोंदी ठेवाव्यात. प्रत्येक छावणीत पशुपालक समितीची स्थापना करून या समितीची बैठक दर आठवड्याला बैठक घेण्याच्या सूचनाही धायगुडे यांनी दिल्या.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search