Next
निवृत्तिवेतनातून शाळेला मदत
मोहन काळे
Saturday, January 06 | 01:08 PM
15 0 0
Share this story


सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल’चे माजी मुख्याध्यापक पांडुरंग सोलनकर यांनी ज्युनिअर कॉलेजच्या विकासासाठी आपल्या निवृत्तिवेतनातून सुमारे २५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश शाळेला दिला. आपल्या या कृतीतून त्यांनी इतर रयत सेवकांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 

‘माझ्या कार्यकाळात ज्युनिअर कॉलेजला शासनाची मान्यता मिळाली. त्यामुळे या कॉलेजच्या विकासासाठी आपलीही मदत व्हावी, म्हणून मी माझ्या निवृत्तिवेतनातून हा धनादेश शाळेला दिला,’ असे सोलनकर यांनी सांगितले. 
 
या वेळी संस्थेचे माजी सचिव डॉ. जे. जी. जाधव, विठ्ठल कारखान्याचे संचालक सूर्यकांत बागल, मुख्याध्यापक एम. डी. पाटील, आप्पा फाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चारुदत्त पाटील, के. एन. बागल, जे. बी. धायगुडे, गणेश बागल, सरपंच सुनीता हुंडेकरी, लक्ष्मण कांबळे, मंदाकिनी बागल, सुनीता बागल, सुभद्रा पाटील, लक्ष्मी बागल आदी मान्यवर उपस्थित होते.

गादेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पांडुरंग सोलनकर यांनी मुख्याध्यापक म्हणून चांगली सेवा केली. ग्रामस्थ, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती व गावातील शिक्षणप्रेमींच्या सहकार्याने त्यांनी शाळेतील भौतिक सुविधा पूर्ण करण्यावर भर दिला. त्यांनी आपल्या कार्यकाळात स्वच्छतागृहाचे बांधकाम, शाळेचे कंपाउंड, स्टेज व शाळेतील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे यांसारखी महत्त्वाची कामे पूर्ण केली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठीही विशेष प्रयत्न केले. अगदी सेवानिवृत्ती जवळ आली असताना, त्यांनी स्वयं अर्थसहाय्यित ज्युनिअर कॉलेजसाठी मान्यता मिळवण्याचे काम केले. शाळा विकासासाठी त्यांनी निष्ठेने काम केल्यामुळे रयत शिक्षण संस्थेने त्यांच्यावर आता आश्रमशाळेचे प्रकल्प अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link