Next
‘जीविधा’तर्फे पृथ्वी विज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, June 20 | 12:16 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘जीविधा’ या संस्थेने पृथ्वी विज्ञानातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे. या अभ्यासक्रम २२ जून ते आठ सप्टेंबर २०१८ या कालावधीत दर शुक्रवारी आणि शनिवारी संध्याकाळी ६.१५ ते ८.३० यावेळेत घेतला जाईल.

विश्वाची आणि पृथ्वीची निर्मिती, पृथ्वीवरील वातावरण, समुद्र यांच्या निर्मितीबरोबरच इतर प्राणिमात्रांची व मनुष्याची सुरुवात, पृथ्वीची गती, दिवस-रात्र, ऋतूंची निर्मिती, कालगणना, भरती ओहोटी, नद्या, हिमनद्या, समुद्र, वारे यांचे कार्य आणि त्यातून निर्माण होणारी विविध भूरूपे या सगळ्या गोष्टींबरोबरच हवामान बदल, भूकंप, ज्वालामुखी, समुद्र पातळीतील बदल अशा संकल्पनांचाही या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

निसर्ग निर्मित आणि मनुष्य निर्मित संकटांचा व आपत्तींचा सामना आपण करीत आहोत त्यांचे भूशास्त्रीय विवेचन व आपत्ती निवारणाचे उपाय अशा आवश्यक गोष्टींबाबतही या प्रमाणपत्र अभ्यासक्रमादरम्यान भूशास्त्र विषयातील अनेक तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल. या अभ्यासक्रमादरम्याने रविवारी अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात येणार असून, पुण्याबाहेरील एक दिवसाच्या सहा व पुण्यात अर्ध्या दिवसाची एक अशा एकूण सात अभ्यास सहली या कालावधीत होतील.

अभ्यासक्रमाच्या माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क :
‘जीविधा’चे संचालक राजीव पंडित- ९४२२३ ६५८३१, ९४२१० १९३१३.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link