Next
डॉ. कोदवडेंचा अमेरिकेतील चर्चासत्रात सहभाग
प्रेस रिलीज
Wednesday, July 25, 2018 | 03:05 PM
15 0 0
Share this article:

इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमधील कॉम्प्युटर विभागप्रमुख व डीन डॉ. डी. व्ही. कोदवडे यांना टेनिसी टेक्नॉलॉजी विद्यापीठाने संगणक अभियांत्रिकी शाखेतील प्राध्यपकांच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये चर्चासत्रासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये सहभाग घेऊन संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम कसा असावा व त्यामुळे भविष्यामध्ये कुशल मनुष्यबळ कसे विकसित होईल, यावर मत व्यक्त केले.

या कार्यशाळेमध्ये डॉ. कोदवडे यांनी संगणकाची कार्यक्षमता वाढवणे व त्यासाठी संगणक प्रणाली विकसीत करणे यावर प्रामुख्याने चर्चासत्र केले. सध्याच्या युगात संगणक अभियांत्रिकी क्षेत्रात झपाटयाने टेक्नॉलॉजी बदलत आहे. या संदर्भात अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनने पुढाकार घेऊन संगणक अभियांत्रिकी प्राध्यापकांची ही आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजित केली होती.

यात जगभरातून एकूण आंतरराष्ट्रीय स्तरावरील ४८ संगणक अभियांत्रिकी शाखेतील प्राध्यपकांनी सहभागी होण्यासाठी आपले प्रस्ताव सादर केले होते. त्यापैकी युएसए, फ्रान्स, भारत, स्पेन, युके, जर्मनी या देशांतील १७ संशोधक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ यांना त्यांच्या संगणक अभियांत्रिकी क्षेत्रातील योगदान, संशोधन कार्य या सर्व बाबींचा विचार करून कार्यशाळेसाठी आमंत्रित केले होते.
 
डॉ. डी. व्ही. कोदवडेया कार्यशाळेमुळे प्रा. कोदवडे यांना जगभरातील विविध संशोधक तज्ज्ञांशी विचार विनिमय करण्याची संधी मिळाली. ही कार्यशाळा प्रा. कोदवडे यांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी व ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे. या चर्चासत्रामध्ये विदेशातील तज्ज्ञांवर प्रा. कोदवडे यांचा प्रभाव पडला आहे.

या अभ्यास दौऱ्यामध्ये निवड झालेले प्राध्यापक अमेरिकेतील कंपन्यांना भेटी देणार आहेत. विविध देशातील प्राध्यपकांशी होणाऱ्या इंटरअ‍ॅक्शनचा फायदा ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांना होणार आहे. इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले व डे.डायरेक्टर प्रा. डॉ. यू. जे. पाटील, डे.डायरेक्टर डॉ. एल. एस. आडमुठे यांचे या कार्यामध्ये विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या यशाबददल डॉ. कोदवडे यांचा संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, संस्थेच्या सचिव डॉ. सपना आवाडे व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search