Next
श्रीकांत सामल यांना ‘एईएसए’चा जीवनगौरव पुरस्कार
प्रेस रिलीज
Thursday, March 14, 2019 | 04:14 PM
15 0 0
Share this story

श्रीकांत सामल यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविताना डावीकडून विश्वास कुलकर्णी, रणजीत घोगले, व्ही. व्ही. बडवे, सामल, रवी गद्रे, राजीव राजे व पुष्कर कानविंदे.

पुणे : बांधकाम अभियांत्रिकी क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आर्किटेक्ट, इंजिनीअर अॅंड सर्व्हेअर्स असोसिएशन (एईएसए) यांच्या वतीने पुण्यातील प्रसिद्ध अभियंते श्रीकांत सामल यांना जीवनगौरव पुरस्कार देत गौरविण्यात आले. पीवायसी हिंदू जिमखाना येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात आर्किटेक्ट व्ही. व्ही. बडवे यांच्या हस्ते सामल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

आर्किटेक्ट, इंजिनीअर अॅंड सर्व्हेअर्स असोसिएशनचे अध्यक्ष आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी, माजी अध्यक्ष आर्किटेक्ट रवी गद्रे, उपाध्यक्ष पुष्कर कानविंदे, आर्किटेक्ट रणजीत घोगले आदी या वेळी उपस्थित होते.

श्रीकांत सामलसामल यांनी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून १९६०मध्ये पदवी घेतली. १९६३ साली त्यांनी आपल्या वडिलांसोबत एस. वाय. सामल आणि कंपनीची स्थापना करून स्वतंत्रपणे व्यवसायास सुरुवात केली. १९८४ साली त्यांनी सामल कन्स्ट्रक्शन. प्रा. लि. ही कंपनी स्थापन केली. या अंतर्गत पुणे, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, लोणावळा, सोलापूर, रत्नागिरी, कणकवली आणि बारामती या ठिकाणी त्यांनी कारखाने, इमारती, कॉर्पोरेट कार्यालये, अनिवासी व निवासी इमारती, शैक्षणिक संस्था, बंगले यांची बांधकामे केली आहेत. पुण्यामध्ये संचेती हॉस्पिटल, ज्ञान प्रबोधिनी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, टाटा हाऊसिंग, ओसवाल बंधू समाज, सिंहगड टेक्निकल सोसायटी, एलआयसी हाउसिंग कॉलनी यांची बांधकामेदेखील त्यांनी केली आहेत. १९८५ साली बलदोटा सामल असोसिएटस् या कंपनीची स्थापना करून अनेक ओनरशिप स्कीम्स गेली ३४ वर्षे केल्या आहेत. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link