Next
युनिक इंग्लिश मीडियमचे दहावी परीक्षेत यश
प्रेस रिलीज
Monday, June 10, 2019 | 12:43 PM
15 0 0
Share this article:

संस्कृती त्रिमुखेसुरज शिर्केनिकिता जांगीडपुणे : ईगल एज्युकेशन सोसायटी संचालित कात्रज कोंढवा रोडवरील युनिक इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. संस्कृती त्रिमुखे हिने ९३.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. सुरज शिर्के याने ९०.४० टक्क्यांसह दुसरा, तर निकिता जांगीड हिने ९० टक्क्यांसह तिसरा क्रमांक पटकावला. 

संस्कृती आणि निकिता या दोन्ही विद्यार्थिनींनी गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले. शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये एकूण ७१ विदयार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी २८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे ईगल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर. ए. मुलाणी, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री जाधव, उपमुख्याध्यापिका सुनिता चांदगुडे यांसह सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search