Next
‘ज्योतिष ज्ञान’ दिवाळी अंकाचे प्रकाशन
प्रेस रिलीज
Monday, October 22, 2018 | 02:43 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘ज्योतिष ज्ञान’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन २१ ऑक्टोबर रोजी मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवयित्री प्रतिभा शाहू-मोडक यांनी भूषविले. हा कार्यक्रम उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे झाला. या वेळी ‘ज्योतिष ज्ञान’ दिवाळी अंकाचे संपादक आणि ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर यांचे व्याख्यान झाले.

मारटकर म्हणाले, ‘ग्रहस्थिती पाहता २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) जागांमध्ये घट होईल. सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागेल. सर्वांत मोठा पक्ष म्हणून ‘भाजप’ला सत्ता स्थापन करण्यासाठी संधी मिळेल,’ असे भाकित ‘ज्योतिष ज्ञान’ दिवाळी अंकाचे संपादक आणि ज्योतिष विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर यांनी वर्तवले.

‘लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा वाढतील; पण काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचता येणार नाही. महाराष्ट्रात मुदतपूर्व विधानसभा निवडणूक झाल्यास भाजप-शिवसेना युतीला सत्ता स्थापन करता येईल, मात्र नियोजित वेळापत्रकानुसार राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यास सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीला सत्ता स्थापनेसाठी संघर्ष करावा लागेल. डिसेंबर महिन्यात होणारी सहा राज्यांतील विधानसभा निवडणूक ‘भाजप’ला जड जाईल. सत्ता बदलाचे योग आहेत,’असे मारटकर यांनी नमूद केले.

‘२०१९मध्ये पाऊस उशीरा सुरू होईल आणि सरासरीपेक्षा कमी पडेल. शेअर मार्केट तेजीत राहील. शेजारी राष्ट्रांच्या कटकटी सुरू राहतील,’ असेही भाकित मारटकर यांनी केले.

गाडगीळ म्हणाले, ‘सर्वसामान्यांना ज्योतिष आणि भविष्याबद्दल कुतूहल असतेच; पण ज्योतिषाच्या टीकाकारांनाही स्वतःच्या भविष्यात जाणून घेण्याची उत्सुकता असते. ‘मी वेगळ्या क्षेत्रात यशस्वी होणार’ असे भविष्य माझ्या शाळकरी वयात दासगणू महाराजांनी वर्तवले होते.’

‘आयुष्यात चांगल्या गोष्टींवर श्रद्धा ठेवली की मार्ग दिसतो. ज्योतिषाच्या माध्यमातून ही बऱ्याच गोष्टी समजतात,’ असे प्रतिभा मोडक म्हणाल्या.

चंद्रकांत दीडभाई यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search