Next
पुण्यात ‘टीसीएस आयटी क्विझ’चे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, October 01, 2018 | 05:46 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या अग्रगण्य आयटी सेवा कन्सल्टिंग अॅंड बिझनेस सोल्युशन्स फर्मतर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘टीसीएस आयटी क्विझ २०१८’ या प्रश्नमंजूषेची पुण्यातील फेरी चार ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही स्पर्धा कोथरूड भागातील कर्वे रोडवर शिवाजी पुतळ्याजवळ यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होईल,’ असे ‘टीसीएस’ने जाहीर केले आहे.   

यासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. आठवी ते बारावीत शिकणारे शालेय विद्यार्थी (विद्यापीठपूर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थीही भाग घेऊ शकतात) या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र असून, एका शिक्षणसंस्थेला यासाठी जास्तीत जास्त १२ संघ (प्रत्येक संघात दोन विद्यार्थी) पाठवता येणार आहेत. ‘टीसीएस आयटी विझ २०१८’ भारतातील अहमदाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वेर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, इंदोर, कोची, कोलकाता, मुंबई, नागपूर आणि पुणे या १२ शहरांमध्ये घेतली जाणार आहे.

लिखित प्राथमिक फेरीतील पहिले सहा संघ प्रादेशिक फेरीसाठी पात्र ठरतील. एकाच शाळेचे एकाहून अधिक संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले, तरी त्यातील सर्वाधिक गुणसंख्या असलेल्या संघालाच व्यासपीठावर बोलावले जाईल. प्रादेशिक फेरीत जिंकणारा संघ राष्ट्रीय अंतिम फेरीत सहभागी होईल.

प्रादेशिक विजेत्याला यंदा ६० हजार रुपये मूल्याची, तर उपविजेत्यांना ४० हजार रुपये मूल्याची गिफ्ट व्हाउचर्स दिली जातील. याशिवाय विशेष डिझाइन केलेली ट्रॉफी आणि पदकेही दिली जातील. अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या सहा संघांनाही ‘टीसीएस’तर्फे अनेक बक्षिसे दिली जातील. यात जीम बॅग, ब्ल्यूटूथ स्पीकर्ससह मल्टिफंक्शनल म्युझिक टॉर्च, ‘टीसीएस५०’ पेन ड्राइव्हसह वायरलेस आउटडोअर स्पीकर्स आदींचा समावेश आहे.

प्रत्येक शहरातील प्रादेशिक फेरीमध्ये सर्व स्पर्धकांसाठी एक ट्विटर काँटेस्ट घेतली जाईल. सर्वाधिक ट्विस्ट्स आलेल्या दोन स्पर्धकांना, तसेच ‘दिवसातील सर्वोत्तम ट्विट करणाऱ्या स्पर्धकाला ब्लूटूथ स्पीकर असलेल्या स्मार्ट म्युझिक फ्लॉवर पॉटसह मल्टिफंक्शनल टॉर्च आणि एलईडी नाइट लाइट अशी बक्षिसे देण्यात येतील. अन्य ठिकाणच्या विद्यार्थ्यांना यात भाग घेणे सोपे जावे यासाठी प्रादेशिक अंतिम फेऱ्यांचे लाइव्ह वेबकास्टचे आयोजन करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search