Next
‘भारतरत्न पुरस्काराने साठेंचा गौरव होण्यासाठी प्रयत्न करणार’
प्रेस रिलीज
Friday, August 03 | 03:37 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘जागतिक कीर्तीचे साहित्यसम्राट क्रांतिकारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्यिक आणि  सामाजिक क्षेत्रात अतुलनीय योगदान आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव भारतरत्न किताबाने व्हावा यासाठी आपण प्रयत्नशील आहोत,’ असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून ते बोलत होते. ते म्हणाले, ‘लोकशाहीर साठे यांचे साहित्य माणसातील माणूस जागा करणारे, माणसा-माणसातील भेद दूर सारून माणूस जोडणारे, क्रांतिकारी साहित्य आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे अप्रतिम वर्णन करणारी लावणी त्यांनी लिहिली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. श्रमिक कष्टकरी वर्गासाठी त्यांनी साहित्यातून संघर्ष आणि जागृती निर्माण केली. त्यांच्या साहित्यामुळे शोषित, वंचित, श्रमिक आणि दलितांबद्दच्या प्रश्नांबद्दल जागतिक स्तरावर सहानुभूती मिळाली.’

‘अण्णा भाऊ साठे यांनी ‘जग बदल घालूनी घाव सांगून गेले आम्हा भीमराव’ ही काव्यपंक्ती लिहून मातंग समाजासह सर्व वंचित समाज घटकाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार आणि त्यासाठी सनदशीर मार्गाने संघर्ष करण्याचा विचार मांडला आहे,’ असे आठवले यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link