Next
‘सॅमसंग’ने सादर केला ‘गॅलॅक्‍सी ओएन८’
प्रेस रिलीज
Thursday, August 02, 2018 | 12:14 PM
15 0 0
Share this story

नवी दिल्ली : भारतातील विश्वसनीय स्‍मार्टफोन ब्रँड असलेल्या सॅमसंगने ‘गॅलॅक्‍सी ओएन८’ नुकताच सादर केला. हा नवीन स्‍मार्टफोन केवळ ऑनलाइन उपलब्ध असून, तो ई-कॉमर्स प्‍लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि सॅमसंग ऑनलाइन शॉपवर (shop.samsung.com/in) खरेदी करता येणार आहे.

‘गॅलॅक्‍सी ओएन८’मध्ये सहा इंच मोठ्ठी एमोलेड इन्फिनिटी डिस्‍प्‍ले आणि इंडस्‍ट्रीमधील ड्युअल कॅमेरा फीचर उपलब्ध आहे. फोनचे फीचर्स आर्टिफिशियल इंटेलिजेंसने पॉवर्ड असून, यूजर्सना फोटोच्या समोरील आणि मागील बाजुंसोबत प्रयोग करण्याची संधी देतात. यामुळे व्यावसायिक स्तरावरील फोटोचा आनंद युजरला घेता येऊ शकतो. ड्युअल कॅमेरा सॅमसंगच्या फ्लॅगशिप ‘लाइव फोकस’ फीचरसोबत येतो. ज्याच्या मदतीने युजर बॅकग्राउंडला धूसर करून फोरग्राउंडला पूर्ण एकाग्र करू शकतो.

नवीन ‘गॅलॅक्‍सी ओएन८’ बॅकग्राउंड ब्‍लर शेप, पोर्ट्रेट डॉली आणि पोर्ट्रेट बॅकड्रॉप या तीन नवीन शक्तिशाली ड्युअल कॅमरा फीचर्ससोबत आणला आहे. बॅकग्राउंड ब्‍लर शेपच्या मदतीने युजर वेगवेगळ्या तऱ्हेने फोटोंमध्ये सॉफ्ट लाइट इफेक्ट देऊ शकतो. पोर्ट्रेट डॉली फीचर सिनेमॅटिक फोटोग्राफी अनुभवासाठी बॅकग्राउंडमध्ये जुम मूव्हमेंट्ससह मुव्हिंग जीआईएफ इमेज देण्याचे काम करतो; तसेच पोर्ट्रेट बॅकड्रॉप मोडच्या मदतीने युजर्स कूल और फंकी बॅकग्राउंड इफेक्‍ट्ससोबत फोटोग्राफीला व्यावसायिक स्पर्श देऊ शकतो.

सॅमसंग इंडियाच्या ऑनलाइन बिझनेसचे वाइस प्रेसिडेंट, संदीप सिंह अरोरा म्हणाले, ‘सॅमसंगमध्ये आमचा नेहमीच प्रयत्न आहे की आम्ही आमचे प्रॉडक्ट आणि सेवेमध्ये अशी अर्थपूर्ण नाविन्यता घेऊन यावे जे वास्तवात वापरकर्त्याला जीवन मूल्यात जोडून ठेवेल. सॅमसंगच्या सिग्‍नेचर इन्फिनिटी डिस्प्लेसोबत येणारा ‘गॅलॅक्‍सी ओएन८’ अत्‍याधुनिक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर फीचर्सनी डिवाइस आहे. ‘गॅलॅक्‍सी ओएन८’मध्ये आम्ही कॅमेऱ्यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. जे आजच्या तरुणांमध्ये सर्वाधिक वापरले जाणारे फीचर आहे.’

फ्लिपकार्ट मोबाइल्‍सचे सीनियर डायरेक्टर अय्यपन राजगोपाल म्हणाले, ‘सॅमसंग गॅलॅक्‍सी ऑन सीरिजचा नवीन स्‍मार्टफोन फ्लिपकार्ट पर सादर झाल्याने आम्ही आनंदात आहोत. क्वॉलिटी आणि विश्वासार्ह ब्रँड इक्विटीच्या खात्रीसोबत ‘गॅलॅक्‍सी ओएन८’ भारताच्या ऑनलाइन ग्राहकांची गरज पूर्ण करतो, जे आपल्या स्‍मार्टफोनकडून जास्त अपेक्षा ठेवतात.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link