Next
‘व्यसनाधीन पिढी समाजाला हानिकारक’
प्रेस रिलीज
Saturday, March 24, 2018 | 11:12 AM
15 0 0
Share this article:

हेमंत टकलेमुंबई : ‘दारू पिणे हा आज एक स्टेटस सिम्बॉल म्हणून पुढे येऊ लागला आहे. व्यसनाधीन झालेली ही पिढी हिंसाचाराला निमंत्रण देत असून, समाजाच्या स्वास्थ्याला हानिकारक होत चालली आहे,’ अशी खंत आमदार हेमंत टकले यांनी व्यक्त केली.

नियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान आमदार टकले यांनी समाजात वाढलेल्या व्यसनाधीनतेकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी केली आहे. ३१ डिसेंबरच्या दुसर्‍या दिवशी मद्यप्राशन चालकांची आकडेवारी जाहीर होते. त्यामुळे आता मोठमोठ्या हॉटेलमध्ये वाहनचालकही दिले जात आहेत.

‘आजच्या पिढीला व्यसनाशिवाय इतर कोणत्या गोष्टीत विरंगुळा मिळेल याकडे शासनाला लक्ष द्यावे लागेल,’ अशी सूचनाही टकले यांनी केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search