Next
भगवान श्रीगोपाळकृष्णांच्या बालक्रीडा
BOI
Friday, October 26, 2018 | 10:20 AM
15 0 0
Share this story

मथुरेत जन्मलेल्या, गोकुळात वाढलेल्या श्रीकृष्णाच्या बालक्रीडा अत्यंत मधुर वाटतात. कृष्णाच्या जन्मापासून कंस वधापर्यंत सर्वच गोष्टी अनेकदा वाचून-ऐकूनही पुनःपुन्हा त्यांचा आस्वाद घ्यावासा वाटतो. हा आनंद स्वामी माधवानंद (डॉ. माधव नगरकर) यांच्या ‘भगवान श्रीगोपाळकृष्णांच्या बालक्रीडा’तून मिळतो.

कृष्णजन्मापूर्वीची सामाजिक स्थितीच्या वर्णनानंतर कथांना सुरुवात होते. वासुदेव-जानकीच्या विवाहातील आकाशवाणीनंतर कंसाचे वर्तन बदलते. बहिण व मेव्हण्याला कोठडीत ठेऊन डांबल्यानंतर त्यांचे प्रत्येक अपत्य मारले जाते; मात्र आठव्या अपत्याला वासुदेव गोकुळात नंदाच्या घरी पोचवितो. गोपींमध्ये कृष्णाचे पालनपोषण लाडाकोडात होत असते. यशोदामैयाच्या प्रेमात न्हाऊन निघत असलेला कन्हैय्या गोपींच्या खोड्या काढत असे. त्याच्या लटक्या तक्रारीही गोपी करीत असल्या, तरी त्यांना करमत नसे. अशा आनंदी बालपणात कृष्णावर अनेक संकटेही येतात; पण त्यांना तो पुरून उरतो. शेवटी मथुरेला परतण्याची वेळ आल्यानंतर गोकुळ दुःखसागरात बुडते. या व पुढे कंसवधाचा सर्व मूळ कथांबरोबरचा अनेकांना अपरिचित असलेल्या उपकथा व प्रसंगांचे रसाळ वर्णन यात आहे.   

प्रकाशक : स्वरूपयोग प्रतिष्ठान  
पाने : १९९
किंमत : १५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link