Next
‘तुला पाहते रे’च्या शूटिंगचा शेवटचा दिवस
अभिनेत्री अभिज्ञा भावेने शेअर केले फोटोज
BOI
Monday, July 01, 2019 | 04:15 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांच्या मनाची पकड घेत घराघरात स्थान मिळवलेली झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुला पाहते रे’ आता शेवटाच्या उंबरठ्यावर असून नुकतेच या मालिकेचे शूटिंग संपले आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावेने हे सांगत सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहेत.

सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका १३ ऑगस्ट २०१८ला सुरू झाली होती. मालिकेतील विक्रांत सरंजामे आणि ईशा यांची प्रेमकहाणी चांगलीच गाजली. या कथानकावर टीकाही झाली, त्याची भरपूर थट्टाही केली गेली आणि प्रेक्षकांनी त्यावर भरपूर प्रेमही केले. अतिशय कमी वेळात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. 

विक्रांत-ईशा यांच्यातील हळुवार फूलत जाणारे नाते, त्यांचे लग्न आणि त्यानंतर समोर आलेले विक्रांतचे खरे रूप, ईशाला समजलेली राजनंदिनी असे कथानक वळण घेत असताना प्रत्येक वळणावर अनेक नवीन गोष्टी मांडत हे कथानक आता शेवटापर्यंत आले आहे. जुलैमध्ये ही मालिका संपेल असे सुबोध भावेने आधीच सांगितले होते. मात्र या मालिकेत ‘मायरा’ची भूमिका साकारलेली अभिज्ञा भावे हिने नुकतेच सोशल मीडियावर या मालिकेच्या चित्रिकरणाचे काही फोटो शेअर करत, या मालिकेचे शुटिंग संपल्याचे सांगितले आहे. 

हे फोटोज शेअर करताना अभिज्ञाने, ‘‘तुला पाहते रे’ या मालिकेतील हा प्रवास खूप सुंदर होता. या आठवणी कायम माझ्यासोबत असतील. शेवटाचा विचार आपण कधीच करत नाही, मात्र तुला पाहते रे मधील मायराचा प्रवास आता संपला आहे’, असे लिहिले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search