Next
फेडेक्स एक्स्प्रेसचा वायरकार्डसोबत सहयोग
प्रेस रिलीज
Monday, April 09, 2018 | 06:45 PM
15 0 0
Share this story

मुंबई : जगातील सर्वात मोठी एक्स्प्रेस ट्रान्सपोर्टेशन कंपनी आणि फेडेक्स कॉर्पची उपकंपनी असलेल्या ‘फेडेक्स एक्स्प्रेस’ने जगातील अग्रणी डिजिटल वित्त तंत्रज्ञान पुरवठादार असलेल्या वायरकार्डसोबत सहकार्य करार केला आहे.  

भारतातील रिटेल क्षेत्रात विस्तारीकरण आणि स्थानिक अॅक्सेस पॉइंट वाढविणे यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात फेडेक्सतर्फे वायरकार्डच्या दोनशे रिटेल एजंट आउटलेट्समध्ये काम सुरू करण्यात आले. २०१८ अखेरपर्यंत वायरकार्ड स्मार्टशॉप नेटवर्कच्या एक हजार  ठिकाणी फेडेक्सतर्फे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.
 
वायकार्डसोबत सहयोग करणे हा फेडेक्स ऑथोराइझ्ड शिप सेंटर (एफएएससी) कार्यक्रमाचा एक भाग आहे. या माध्यमातून ग्राहकांना सुविधाजनक आणि सुरक्षित पिक-अप आणि ड्रॉप सेवा पुरविण्यात येते. दक्षिण भारतातील पाच राज्ये आणि नवी दिल्ली येथील वायरकार्डच्या सुमारे दोनशे  रिटेल एजंट आउटलेट्समध्ये फेडेक्सची सेवा देण्यात येते. भारतभरातील सहाशे ८०  फेडेक्स अॅक्सेस पॉइंट्सव्यतिरिक्त ही आउटलेट्स आहेत.
 
 या वर्षात वायरकार्डच्या एक लाख ५० हजार  ठिकाणी असलेल्या स्मार्टशॉपच्या भक्कम जाळ्यांमध्ये फेडेक्स सेवा झपाट्याने वाढणार आहे. वायरकार्डचे स्मार्टशॉप जाळे संपूर्ण भारतीय उपखंडात पसरलेले आहे. ग्राहकांना त्यांच्यातर्फे डिजिटल वित्तीय सेवा आणि त्यांच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देण्यात येतात. ग्राहक जिथे राहतात किंवा काम करतात तिथे या जाळ्याच्या माध्यमातून वायरकार्डतर्फे सेवा पुरविण्यात येते.
 
‘रिटेल क्षेत्र हे भारतातील एक वेगाने विकसित होणारे क्षेत्र आहे. २०१६ मध्ये या क्षेत्राची उलाढाल ७०.४५ अब्ज अमेरिकन डॉलर्स होती.  २०१९पर्यंत ही उलाढाल एकशे अकरा अब्ज अमेरिकन डॉलर होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

 ‘वायरकार्डचे रिटेल आउटलेट्सचे भक्कम जाळे आणि विस्तृत ग्राहकवर्ग यामुळे फेडेक्ससाठी हा एक आदर्श जोडीदार आहे. या माध्यमातून   ग्राहकांना अधिक चांगल्या आंतरराष्ट्रीय व स्थानिक वाहतूक उपाययोजना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या युतीमुळे फेडेक्सचे ग्राहक आता निवडक वायरकार्डच्या स्मार्टशॉप नेटवर्क स्टोअरमधून पॅकेज पिक अप आणि ड्रॉप-ऑफ सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत’, असे फेडेक्स एक्स्प्रेसच्या ग्राउंड ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष फिलीप चेंग म्हणाले. 
 
‘फेडेक्स एक्स्प्रेससोबत काम करताना आणि आमच्या ग्राहकांच्या दैनंदिन आयुष्यात सुविधा पुरविणाऱ्या आणि निगडित असणारी आमची उत्पादने व सेवा यांचे अधिक विस्तारीकरण करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे’, असे भारतातील वायरकार्डच्या मंडळाचाचे सदस्य आणि कन्झ्युमर सोल्युशन्स विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष जॉर्ज वॉन वाल्डनफेल्स म्हणाले. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link